सिंधुदुर्ग जिल्हा प्राथमिक शिक्षक पतपेढीच्या अध्यक्षपदी सिताराम लांबर. ; धनगर समाजोन्नती मंडळाकडून सत्कार, समाजासाठी अभिमानाचा क्षण.

✍️ विलास जंगले.

सावंतवाडी : उपक्रमशील शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते आणि सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आदर्श पुरस्कार प्राप्त शिक्षक सिताराम लांबर यांची सिंधुदुर्ग जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतपेढीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. धी सावंतवाडी तालुका धनगर समाजोन्नती मंडळ, मुंबई शाखा सावंतवाडीच्या वतीने त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

धी सावंतवाडी तालुका धनगर समाजोन्नती मंडळाचे माजी तालुका अध्यक्ष तसेच विद्यमान कार्यकारिणी सदस्य म्हणून कार्यरत असलेल्या लांबर यांनी शिक्षण, समाजकारण आणि शिक्षक चळवळीत उल्लेखनीय योगदान दिले आहे. त्यांच्या निवडीमुळे धनगर समाजाला प्रथमच हा मान मिळाल्याची भावना व्यक्त करत समाजबांधवांनी आनंद व्यक्त केला.

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण शिक्षणाचा ध्यास घेत सेवाव्रत जपणारे, शिक्षक आणि शाळांच्या प्रश्नांसाठी सातत्याने लढणारे तसेच पालक, ग्रामस्थ आणि समाज बांधवांना आपुलकीने सोबत घेऊन काम करणारे नेतृत्व म्हणून लांबर सरांची ओळख आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली पतपेढीची अधिक प्रगती होऊन शिक्षक बांधवांना त्यांच्या कार्याचा लाभ मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

यावेळी अध्यक्षपदाची संधी उपलब्ध करून देणाऱ्या संचालक मंडळ, शिक्षक संघटनांचे पदाधिकारी आणि जिल्ह्यातील शिक्षक वर्गाचेही आभार मानण्यात आले.

सत्कार समारंभास शाखा सचिव विलास जंगले यांच्यासह लक्ष्मण पाटील, विठ्ठल कुंभार, शेखर डोईफोडे, विजय रामचंद्र जंगले, जनार्दन लांबर, मंगेश वरक, परशुराम लांबर, विजय जंगले, नंदू खरात आदी पदाधिकारी व समाजबांधव उपस्थित होते.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles