मैदानाबाहेरही ‘चॅम्पियन’ ठरली सावंतवाडी तालुका हौशी क्रिकेट संघटना. ; तीन संस्थांना दिली भरीव आर्थिक मदत.

सावंतवाडी : क्रीडा क्षेत्रासोबतच सामाजिक बांधिलकी जपत सावंतवाडी तालुका हौशी क्रिकेट संघटनेने एक कौतुकास्पद पाऊल उचलले आहे. संघटनेकडे जमा असलेल्या निधीमधून परिसरातील तीन विविध सामाजिक संस्थांना प्रत्येकी २६ हजार ५०० रुपयांची आर्थिक मदत (देणगी) सुपूर्द करण्यात आली आहे.

सावंतवाडी तालुका हौशी क्रिकेट संघटनेकडे एकूण ८० हजार रुपये निधी जमा होता. या निधीचा विनियोग समाजातील गरजू आणि वंचित घटकांसाठी कार्य करणाऱ्या संस्थांना मदत म्हणून करण्याचा निर्णय संघटनेने घेतला होता. त्यानुसार या रकमेचे समान वाटप करून तीन संस्थांना देणगी देण्यात आली. असिस (ASSIS) दिव्यांग संस्था, इन्सुली, माऊली कर्णबधिर निवासी विद्यालय, आरोस-दांडेली, दयासगर छात्रालय, रोणापाल या तिन्ही संस्थांना ही मदत देऊन संघटनेने सामाजिक उत्तरदायित्वाचा एक आदर्श घालून दिला आहे. हा संपूर्ण उपक्रम यशस्वीपणे राबवण्यासाठी सावंतवाडी तालुका हौशी क्रिकेट संघटनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. यामध्ये संघटनेचे अध्यक्ष प्रा. डॉ. शरद शिरोडकर, खजिनदार आनंद आळवे तसेच सदस्य महेश भाट, बाबा खान, राजा राणे, दिलीप सांगावकर, दत्ता कल्याणकर, अभय नाईक, प्रशांत बांदेकर, विनायक पराडकर यांनी सक्रिय सहभाग नोंदवत हा उपक्रम यशस्वी केला.
संघटनेच्या या दातृत्वाचे आणि सामाजिक भावनेचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles