‘ध्येयधुंद’ च्या दुसर्‍या आवृत्तीचे प्रकाशन १ जून रोजी रत्नागिरीत. : ॲड. नकुल पार्सेकर लिखित माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांची जीवनगाथा.

सावंतवाडी : कोकणचे महान सुपुत्र तथा माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांचा जीवनपट ज्या पुस्तकाच्या माध्यमातून सामाजिक कार्यकर्ते ॲड.नकुल  पार्सेकर यांनी मांडलेला आहे. त्या ध्येयधुंद पुस्तकाच्या दुसर्‍या आवृत्तीचे प्रकाशन सोमवार दिनांक १ जून २०२६ रोजी सकाळी दहा वाजता रत्नागिरीतील सावरकर सभागृहात होणार आहे.
कोकणातील पाचही जिल्ह्यात सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, रोजगार,महिला सबलीकरण,आरोग्य अशा विविध क्षेञात लक्षवेधी काम करणारे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते निलेश सांबरे यानी रत्नागिरी येथे जिजाऊ सामाजिक संस्थेच्या माध्यमातून सुरू केलेल्या श्री भगवान महादेव सांबरे मोफत रुग्णालयाच्या प्रथम वर्धापनदिनाचे औचित्य साधून ध्येयधुंद या पुस्तकाच्या दुसर्‍या आवृत्तीच्या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याचे आयोजन केलेले असून या पुस्तक प्रकाशन सोहळ्यासाठी  सुरेश प्रभू, सौ. उमा प्रभू, डॉ.अमेय देसाई आदि मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

ध्येयधुंद या सुरेश प्रभू यांच्या या पुस्तकाला वाचकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला व पहिली आवृत्ती प्रकाशन सोहळ्या दिवशीच संपली.अनेकानी या पुस्तकाची मागणी केलेली असल्याने दुसरी आवृत्ती प्रकाशित होत आहे.
१९ फेब्रुवारी २०२६ रोजी मुंबईत महाराष्ट्राचे मा.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तत्कालीन राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या शुभहस्ते झाले तसेच मुंबई शिवाजी पार्क येथील स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात एका शानदार सोहळ्यात भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष  रविंद्र चव्हाण, सारस्वत बँकेचे चेअरमन  गौतम ठाकूर, एबीपी माझाचे कार्यकारी संपादक  राजीव खांडेकर, अर्थतज्ज्ञ  जयराम साळगावकर, जिजाऊ सामाजिक संस्थेचे निलेश सांबरे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत प्रकाशन झाले.
रत्नागिरी येथे संपन्न होणाऱ्या या दुसर्‍या आवृत्तीच्या प्रकाशन सोहळ्यासाठी सर्वानी उपस्थित रहावे असे आवाहन या पुस्तक प्रकाशन सोहळ्याचे संयोजक व जिजाऊ सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेश सांबरे व लेखक ॲड. नकुल पार्सॅकर यांनी केले आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles