मुंबई : राज्यातील कोरोना संकट आणि ओबीसी आरक्षणाच्या पेचामुळे गेल्या 4 वर्षांपासून रखडलेल्या विधान परिषदेच्या १६ स्थानिक प्राधिकारी मतदारसंघांच्या निवडणुकीचा बिगुल अखेर वाजला आहे. निवडणूक आयोगाने या १६ जागांसह नागपूरच्या एका जागेसाठी अशा एकूण १७ जागांसाठी निवडणूक जाहीर केली आहे. येत्या १८ जून रोजी यासाठी मतदान होणार आहे. तर २२ जून रोजी मतमोजणी होणार आहे.
निवडणूक जाहीर होताच सत्ताधारी महायुतीमध्ये जागावाटपावरून मोठी रस्सीखेच सुरू झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुती ही निवडणूक एकत्र लढणार असल्याचे स्पष्ट केले असले, तरी जागांच्या दाव्यांमुळे अंतर्गत तिढा निर्माण झाला आहे. नुकत्याच पार पडलेल्या महानगरपालिका, नगरपालिका आणि नगर पंचायतींच्या निवडणुकीत भाजपला मोठे यश मिळाले आहे. या नव्या लोकप्रतिनिधींच्या संख्याबळाच्या जोरावर भाजप महायुतीत आपले वर्चस्व कायम ठेवू पाहत आहे.
कुठे कोणाची ताकद?



