झोळंबे येथे उद्या भव्य पालखी सोहळ्याचे आयोजन. ; स्वामी समर्थांच्या मूळ चर्म पादुकांचे प्रथम आगमन.

दोडामार्ग : तालुक्यातील झोळंबे गावात उद्या रविवारी, दि. २४ मे २०२६ रोजी सकाळी १० वाजता भव्य पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ महाराजांनी वापरलेल्या मूळ चर्म पादुकांचे झोळंबे गावात प्रथमच आगमन होत असल्याने परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे.
या निमित्ताने सकाळी १० वाजता स्वामी पादुकांची सुवास्य नामघोषात मिरवणूक काढण्यात येणार असून, मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहणार आहेत. हा सोहळा श्री देवी माजली मंदिर, झोळंबे येथे संपन्न होणार आहे.
कार्यक्रमांतर्गत दुपारी ५ वाजता अभिषेक व महाआरती होणार आहे. अक्कलकोट येथील स्वामी समर्थांचे परमभक्त श्री चोळप्पा महाराज यांचे पाचवे वंशज वेदमूर्ती श्री नितीन महाराज पुजारी, ब्रह्मवृंद, श्री दादा गावस तसेच गुरुमाऊली (स्वामी समर्थ मठ घावनळे) यांच्या उपस्थितीत धार्मिक विधी पार पडणार आहेत.
तसेच दुपारी १ ते ४ या वेळेत दर्शन व महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. सायंकाळी ६ वाजता स्वामी पादुकांची पालखी अक्कलकोटकडे मार्गस्थ होणार आहे.
या भक्तिमय सोहळ्यास उपस्थित राहून स्वामी पादुकांचे दर्शन व महाप्रसादाचा लाभ घ्यावा, तसेच पालखी मिरवणुकीत सहभागी होऊन सेवेची शोभा वाढवावी, असे आवाहन समस्त झोळंबे ग्रामस्थांनी केले आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles