आम्हाला न्याय मिळेल काय? ; कुडाळ येथील राजाध्यक्ष कुटुंबीयांची आर्त हाक!, काय आहे नेमकं प्रकरण?

कुडाळ : येथील सर्वे नं. 212/1ब/4 या जमिनीप्रकरणी राजाध्यक्ष कुटुंबीयांनी गंभीर आरोप करत, काही व्यक्तींनी अवैधरित्या क्षेत्र बदल, नकाशांमध्ये फेरफार आणि सार्वजनिक रस्ता असल्याचा खोटा भास निर्माण केल्याची तक्रार केली आहे. या प्रकारामुळे वृद्ध कुटुंबीयांना मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

राजाध्यक्ष कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, संबंधित जमीन ही त्यांच्या कुटुंबाची सामाईक मिळकत असून 2010 ते 2012 दरम्यान काही लोकांनी बेकायदेशीररीत्या नकाशे बदलून त्या ठिकाणी सार्वजनिक रस्ता असल्याचे दाखविले. याबाबत त्यांनी कुडाळ भूमी अभिलेख कार्यालयाकडे अर्ज करून माहिती मागविली असता, संबंधित जागेत अधिकृत रस्ता नसल्याचा पुरावा प्राप्त झाल्याचा दावा त्यांनी केला.

यानंतर भूमी अभिलेख विभागाच्या सूचनेनुसार जिल्हा भूमी अभिलेख कार्यालयाकडे अपील करण्यात आले. या अपीलाचा निकाल 3 मे 2023 रोजी प्राप्त झाला. त्यामध्ये सर्वे नं. 212 मूळ हिस्सा नं. 1 तसेच त्यातील पोट हिस्से 1अ, 1ब, 1क, 1ड तसेच 1ब/1, 1ब/2, 1ब/3 आणि 1ब/4 यांची फेरतपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

अपील निर्णयात उपअधीक्षक भूमी अभिलेख, कुडाळ यांनी संबंधित नकाशा अभिलेख आणि मोजणीची फेरतपासणी करून अधिकार अभिलेख व नकाशातील क्षेत्रफळ यांचा मेळ घालून आवश्यक दुरुस्ती करण्याचे निर्देश दिले आहेत.

दरम्यान, राजाध्यक्ष कुटुंबीयांनी काही व्यक्तींनी स्वतःच्या 7/12 उताऱ्यातील जागेसोबत त्यांच्या 212/1ब/4 मधील क्षेत्र एकत्र करून वेगळा तुकडा तयार केला आणि त्यामध्ये अवैध रस्ता दाखविल्याचा आरोप केला आहे. या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून न्याय मिळावा, अशी मागणी दत्तात्रय व. राजाध्यक्ष आणि शीतल ज. आरोसकर यांनी केली आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles