भारतीय महिला ब्रिगेडची जबरदस्त सुरुवात, इंग्लंडचा ३८ धावांनी धुव्वा! ; तब्बल १४ वर्षांआधीचा हिशोब चुकता.

चेम्सफोर्ड : वुमन्स टीम इंडियाने इंग्लंड दौऱ्याची जबरदस्त अशी सुरुवात केली आहे. टीम इंडियाने इंग्लंडचा पहिल्या टी 20i सामन्यात 38 धावांनी धु्व्वा उडवला आहे. टीम इंडियाने 189 धावांचा पाठलाग करणाऱ्या इंग्लंडला 20 ओव्हरमध्ये 8 आऊट 150 रन्सवर रोखलं. इंग्लंडसाठी एमी जोन्स हीने सर्वाधिक 67 धावा केल्या. त्याव्यतिरिक्त एकीलाही 20 हा आकडाही गाठता आला नाही. टीम इंडियाने या विजयासह जुन्या हिशोबाची परतफेड केली. तसेच 4 सामन्यांच्या मालिकेत विजयाचं खातं उघडत 1-0 अशी आघाडीही मिळवली. हरमनप्रीत कौर हीच्या अनुपस्थितीत टीम इंडियाने स्मृती मंधाना हीच्या नेतृत्वात हा विजयी धमाका केला. मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्स हीने विजयात दिलेल्या बहुमुल्य योगदानासाठी तिला ‘प्लेअर ऑफ द मॅच’ पुरस्काराने गौरवण्यात आलं.

इंग्लंडचा 14 वर्षांनंतर हिशोब –

दरम्यान टीम इंडियाने या विजयासह इंग्लंडचा 14 वर्षांनी हिशोब केला. इंग्लंडने 2012 साली टीम इंडियाचा चेम्सफोर्डमधील काउंटी ग्राउंडमध्ये पराभव केला होता. भारताने त्यानंतर आता 2026 साली मिळालेल्या संधीचा फायदा घेत इंग्लंडला पराभूत करुन बरोबरी केली.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles