मोठी बातमी! – प्राजक्त तनपुरेंचा भाजपात प्रवेश! ; मामा जयंत पाटलांची पहिली प्रतिक्रिया काय?

अहिल्यानगर : नकत्याच पार पडलेल्या विधानसभा पोटनिवडणुकीत अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी मतदारसंघातून भाजपच्या अक्षय कर्डिले यांचा मोठ्या मताधिक्याने विजय झाला. येथे राष्ट्रवादीच्या प्राजक्त तनपुरे यांनी उमेदवारी घेण्यास नकार दिल्याने भाजपसाठी ही जागा सहज झाली होती. मात्र, या निवडणुकांवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी तनपुरे यांचा संवाद झाला, तेव्हापासूनच ते भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा होती. अखेर, आज त्यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. तत्पूर्वी, मी आज भाजपात प्रकसेश करतोय. माझे मामा जयंत पाटील यांना भेटायची माझ्यात हिंमत नाही, त्यांना सांगितलं देखील नाही, असे प्राजक्त यांनी म्हटले. त्यानंतर, जयंत पाटलांनी भाचाच्या भाजप प्रवेशावर पहिली प्रतिक्रिया दिलीय.

प्राजक्त तनपुरे यांनी रवींद्र चव्हाण आणि माजी खासदार सुजय विखे पाटील यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. राहुरीचे नगराध्यक्ष आणि इतर पदाधिकाऱ्यांसोबत त्यांनी भाजपचे कमळ हाती घेतले, ते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांचे सख्खे भाचे आहेत. त्यामुळेच, मामा जयंत पाटील आणि शरद पवार यांना देखील भेटायची माझी हिंमत नाही. मात्र, मी मतदारसंघातील अडचणी लक्षात घेऊन भाजपात जाण्याचा निर्णय घेतोय. ज्यांच्या जीवावर मी हा संघर्ष करत आलोय त्यांचा भावनांचा देखील मला विचार करावा लागेल. मला माझ्या कार्यकर्त्यांचं राजकारण बघायचं आहे. मला आता शब्द नाहीत, त्यामुळे बोलणं देखील अवघड झालं आहे, असे प्राजक्त तनपुरे यांनी भाजप प्रवेशाची माहिती देताना म्हटले. गेल्या काही दिवसांपासून तनपुरे यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा होती, अखेर आज त्यांनी कमळ हाती घेतलं. त्यांच्या पक्षप्रवेशावर जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली.

प्राजक्त यांचा भाजप प्रवेश आमच्यासाठी धक्कादायक!

प्राजक्त तनपुरेंचा भाजप प्रवेश झाल्याचं मी काही वेळापूर्वी ऐकलं, माझा आणि त्यांचा काही संपर्क झालेला नाही, त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करणे आमच्यासाठी धक्कादायक आहे, अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी दिली. प्राजक्त यांनी त्यांच्या मतदासंघातील परिस्थिती पाहून हा निर्णय घेतलाय असं मला वाटतं, त्यांनी सुप्रिया सुळेंची भेट घेतली की नाही मला माहित नाही, मी त्यांना संपर्क केलेला नाही, असेही जयंत पाटील यांनी यासंदर्भात बोलताना म्हटले.

यावेळी प्राजक्त तनपूरे यांनी त्यांच्या समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश केला. पक्ष प्रवेशावेळी तनपूरे म्हणाले, मला भाजपाने संधी दिली यासाठी मी आभारी आहे. यापुढे पक्ष मला जी काही जबाबदारी देईल, ती जबादारी पार पाडण्याचे काम मी करतो, असे प्राजक्त तनपुरे म्हणाले.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles