विश्वास, पारदर्शकता आणि सेवाभावाचा नवा अध्याय! ; ‘साईनाथ मल्टीस्टेट’ची सावंतवाडीत दमदार एन्ट्री! ; तब्बल २२८ कोटी ठेवींचा टप्पा पार करत २२ व्या शाखेचा शानदार शुभारंभ!

✍️ प्रा. रुपेश पाटील.

सावंतवाडी : महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांमध्ये यशस्वीपणे कार्यरत असलेल्या ‘साईनाथ मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड’ने आता सिंधुदुर्ग जिल्ह्यातही आपले पाऊल रोवले असून सावंतवाडी येथे नव्या शाखेचा दिमाखदार शुभारंभ करण्यात आला. २२८ कोटी रुपयांच्या ठेवींचा उल्लेखनीय टप्पा पार केलेल्या या संस्थेच्या विस्तारामुळे जिल्ह्यातील ग्राहक, सभासद आणि ठेवीदारांना अधिक सक्षम आर्थिक सेवा उपलब्ध होणार आहेत.

सावंतवाडी शहरातील सृष्टी इम्पेरिया, बाजारपेठ येथे आयोजित भव्य कार्यक्रमात या शाखेचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले. यानिमित्त नूतन शाखेत श्री सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले होते. धार्मिक आणि उत्साहपूर्ण वातावरणात झालेल्या या कार्यक्रमाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

यावेळी बोलताना संस्थापक अध्यक्ष उत्तम जाधव यांनी संस्थेच्या यशस्वी वाटचालीचा आढावा घेतला. ते म्हणाले, “विश्वास, पारदर्शकता आणि ग्राहकाभिमुख सेवा या त्रिसूत्रीच्या बळावर साईनाथ मल्टीस्टेटने आजपर्यंतची यशस्वी वाटचाल केली आहे. सभासद, ठेवीदार, पिग्मी खातेदार आणि ग्राहकांनी आमच्यावर दाखविलेल्या विश्वासामुळेच आम्ही २२८ कोटी ठेवींचा टप्पा गाठू शकलो. सावंतवाडीत शाखा सुरू करण्याचे स्वप्न आज पूर्ण झाले असून लवकरच कर्नाटक राज्यातही नव्या शाखेचा शुभारंभ करण्यात येणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेला दर्जेदार आणि विश्वासार्ह आर्थिक सेवा देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.”

शाखा उद्घाटनाच्या औचित्याने सावंतवाडी आणि परिसरातील विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय योगदान देणाऱ्या मान्यवरांचा साईनाथ मल्टीस्टेटच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला. सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय, पत्रकारिता आणि विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना गौरविण्यात आले.

या प्रसंगी साईनाथ मल्टीस्टेटचे संस्थापक अध्यक्ष उत्तम जाधव, राष्ट्रीय काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्ष साक्षी वंजारी, सकल मराठा समाजाचे अध्यक्ष तथा संपादक सीताराम गावडे, माजी उपनगराध्यक्षा अन्नपूर्णा कोरगावकर, संचालक प्रा. डॉ. सुरेश चौगले, सामाजिक कार्यकर्त्या डॉ. वंदना करंबेळकर, डॉ. प्रवीणकुमार ठाकरे, डॉ. संदीप सावंत, डॉ . मृणाल सावंत, संचालक आनंदा कांबळे, विजय वारके , महेश पाटील, अमर कुंभार, एकनाथ घोरपडे, कृष्णात सुतार, विशाल भांदिगरे, उमेश जाधव, सामाजिक कार्यकर्ते रवी जाधव, आनंद ठोंबरे, शैलेश पै, शिवाजी शेडगे, नीरज देसाई, पत्रकार राजेश मोंडकर, प्रा. रूपेश पाटील, संपादक आनंद धोंड, अमित परब, माहिती अधिकार पदाधिकारी सुशील चौगुले, प्रदीप प्रियोळकर, सातावळेकर, बिझनेस हेड अभिजीत संभाजी, सिनीयर मॅनेजर श्रीकांत हातकर, शाखा व्यवस्थापक शशांक विचारे तसेच साईनाथ मल्टीस्टेटचे अधिकारी, कर्मचारी आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

सावंतवाडीतील या नव्या शाखेमुळे जिल्ह्यातील आर्थिक व्यवहारांना अधिक गती मिळण्याबरोबरच विश्वासार्ह बँकिंग आणि पतसेवा क्षेत्रात साईनाथ मल्टीस्टेट एक महत्त्वपूर्ण पर्याय म्हणून पुढे येणार असल्याची भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles