महायुतीचं टेन्शन वाढलं, तब्बल ८ जागांवर बंडखोरीचा धोका! ; कुठं कुठं कोणाचा अर्ज?

मुंबई : राज्यात सध्या विधानपरिषद निवडणुकीचे रणकंदन सुरू आहे. अनेक नेत्यांनी आपल्या पक्षाचा आदेश झुगारून त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. महायुतीत बंडखोरीचे प्रमाण जास्त असल्याने आता या बंडखोरांना उमेदवारी अर्ज मागे घ्यायला लावण्यासाठी तसेच त्यांची मनधरणी करण्यासाठी प्रयत्न करावा लागणार आहे. छत्रपती संभाजनगर, रायगड या मतदारसंघांतही अशीच स्थिती आहे.

महायुतीमध्ये कुठे कुठे बंडखोरी?

  1. रायगडमध्ये राष्ट्रवादीकडून अनिकेत तटकरेंना उमेदवारी, महेंद्र दळवींची मुलगी जुईली दळवींची बंडखोरी

2) संभाजीनगर-जालना-भाजपकडून सुहास शिरसाठ यांना उमेदवारी,आ.अब्दुल सत्तार यांचे पुत्र समिर सत्तारांची बंडखोरी.

3) यवतमाळ-शिवसेनेकडून दुष्यंत चतुर्वेदींना उमेदवारी, तर भाजपचे नितिन भुतडा, राष्ट्रवादीकडून साजिद बेग यांची बंडखोरी.

4 ) पुण्यात राष्ट्रवादीकडून विक्रम काकडेंना उमेदवारी, भाजपचे प्रदीप कंद यांच्याकडून बंडखोरी.

5)अमरावतीत भाजपकडून प्रविण पोटेंना उमेदवारी, शिवसेनेचे विप्लव बाजोरीयांची बंडखोरी.

6) नाशिक -शिवसेनेकडून नरेंद्र दराडेंना उमेदवारी, अपक्ष गोकूळ गिते, गणेश गितेंचा अर्ज, महाजनांचे निकटवर्तीय.

7) परभणी-शिवसेनेकडून सईदा खान यांना उमेदवारी, राष्ट्रवादीकडून विजय जामकर आणि जिल्हा परिषद सदस्य संग्राम जामकरांची बंडखोरी.

8) नांदेड-भाजपकडून अमरनाथ राजूरकरांना उमेदवारी, राष्ट्रवादीचे प्रविण पाटील चिखलीकरांची बंडखोरी (आमदार चिखलीकरांचा मुलगा)

9) जळगाव – भाजपकडून नंदकिशोर महाजनांना उमेदारी, तर शिवसेनेचे रेश्मा काळे, दीपक धांडेची बंडखोरी.

महाविकास आघाडीत कुठे कुठे बंडखोरी?

1 )नांदेड-रामदास सुमठाणकर काँग्रेसकडून मैदानात,माधवगाव जवळकरांची बंडखोरी,नागेश अष्टीकरांचा मुलगा कृष्णा आष्टीकरांची ठाकरे गटाकडून बंडखोरी.

2) भंडारा गोंदिया-काँग्रेसकडून प्रफुल्ल अग्रवाल यांना उमेदवारी,तर नरेश ईश्वरकर आणि दिलिप बनसोड यांचा अर्ज, उमेदवारी वरुन संभ्रामावस्था.

3) सांगली – शरद पवार गटाकडून बाळासाहेब पाटलांचा अर्ज तर काँग्रेस संजय मेंढे आणि मयूर पाटीलांचा अर्ज

4) सोलापूर-काँग्रेसकडून आदित्य फत्तेपूरकरांना उमेदवारी,शरद पवार गटाकडून वसंत नाना देशमुख आणि शिवसेना ठाकरे गटाकडून नागेश अक्कलकोटेंची बंडखोरी

दरम्यान, महायुतीमध्ये अनेक ठिकाणी बंडखोरी झालेली असली तरी बंडखोरांना त्यांचे उमेदवारी अर्ज मागे घेण्यास सांगितले जाईल, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे. अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख ही 4 जून आहे. तोपर्यंत आम्ही सर्वांशी चर्चा करू आणि योग्य तोडगा काढू, असे शिंदे म्हणाले. तसेच आम्ही ही निवडणूक एकदिलानेच लढवू, असेही शिंदे यांनी सांगितले आहे.

 

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles