युवराज लखमराजे भोंसले यांना वाढदिवसानिमित्त माहिती अधिकार पदाधिकारी सुशिल चौगुले यांच्याकडून शुभेच्छा!

सावंतवाडी : सावंतवाडी या ऐतिहासिक संस्थानाचे युवराज लखमराजे सावंतभोंसले यांचा वाढदिवस आज उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. या निमित्ताने सावंतवाडी येथील माहिती अधिकार पदाधिकारी सुशिल रूपाजी चौगुले यांनी युवराजांची सदिच्छा भेट घेऊन त्यांना पुष्पगुच्छ प्रदान करत वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
यावेळी श्री. चौगुले यांनी युवराज लखमराजे यांच्या सामाजिक, सांस्कृतिक व जनहिताच्या कार्याबद्दल गौरवोद्गार काढत त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या. तसेच सावंतवाडी नगर परिषदेच्या नगराध्यक्ष सौ. श्रद्धाराजे भोसले यांचीही त्यांनी सदिच्छा भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या.
सावंतवाडीच्या ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि राजघराण्याच्या परंपरेचे जतन करण्यासाठी भोसले घराण्याचे योगदान महत्त्वपूर्ण असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. वाढदिवसानिमित्त युवराज लखमराजे यांच्यावर विविध स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव होत असून, नागरिकांकडून त्यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि यशस्वी भवितव्यासाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles