नवनीत राणा राष्ट्रवादीत प्रवेश करणार? ; पुन्हा सुनेत्रा पवारांच्या भेटीनंतर चर्चांना उधाण.

मुंबई : राज्यसभेच्या रिक्त जागांसाठी निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातील राज्यसभा जागेसाठी माजी खासदार नवनीत राणा यांचे नाव चर्चेत आले आहे. ताज्या माहितीनुसार, नवनीत राणा यांनी सर्वप्रथम सुनेत्रा पवार यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली. विशेष म्हणजे, या भेटीनंतर पुन्हा एकदा नवनीत राणा आणि सुनेत्रा पवार यांच्यात चर्चा झाल्याचं सांगितलं जात आहे.

या भेटीगाठींमुळे नवनीत राणा यांच्या राज्यसभा उमेदवारीच्या चर्चांना अधिक जोर आला आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातून उमेदवारी मिळाल्यास नवनीत राणा यांना भाजपची साथ सोडून राष्ट्रवादीत प्रवेश करावा लागू शकतो, अशीही चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

दरम्यान, या जागेसाठी छगन भुजबळांच्या नवाचीही चर्चा होत आहे. मात्र पक्ष निर्णय घ्यायला इतका वेळ लावत आहे हे पाहता, राष्ट्रवादी धक्कातंत्र वापरणार की काय? अशी शंका उपस्थिक केली जात आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख 8 जून असल्याने आता पक्षश्रेष्ठी कोणाला संधी देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles