‘BKC’चा स्तुत्य उपक्रम, सीईटी सेलचा विभागीय सुसंवाद कार्यक्रम आज. ; CAP प्रवेश प्रक्रियेबाबत मिळणार थेट मार्गदर्शन.

सावंतवाडी : महाराष्ट्र शासनाच्या राज्य सामाईक प्रवेश परीक्षा (सीईटी) कक्ष, मुंबई यांच्या वतीने शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठीच्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया (CAP) संदर्भात विभागीय सुसंवाद कार्यक्रमाचे आयोजन आज (ता. ९) सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत भोसले नॉलेज सिटी, चराठे येथील यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये करण्यात आले आहे.
अभियांत्रिकी, फार्मसी, व्यवस्थापन तसेच विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेदरम्यान विद्यार्थी आणि पालकांच्या मनात निर्माण होणाऱ्या शंकांचे निरसन करण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये सीईटी सेलचे अधिकारी CAP प्रक्रियेतील विविध टप्प्यांविषयी सविस्तर मार्गदर्शन करणार आहेत.
प्रवेशासाठी नोंदणी प्रक्रिया, कागदपत्र पडताळणी, पर्याय (ऑप्शन) भरणे, गुणवत्ता यादी, प्रवेश फेऱ्या तसेच तांत्रिक अडचणी यांसारख्या विषयांवर अधिकृत आणि अद्ययावत माहिती विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिली जाणार आहे. तसेच उपस्थितांना अधिकाऱ्यांशी थेट संवाद साधून आपल्या शंकांचे निरसन करण्याची संधी मिळणार आहे.
राज्यातील विविध विभागांमध्ये अशा प्रकारचे सुसंवाद कार्यक्रम आयोजित करून प्रवेश प्रक्रियेबाबत जागरूकता निर्माण करण्याचा उपक्रम सीईटी सेलने हाती घेतला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि प्रवेश प्रक्रियेशी संबंधित घटकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा (सीईटी) कक्षामार्फत करण्यात आले आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles