अर्जुन तेंडुलकरची तुफानी फलंदाजी! ; गोलंदाजांची पिसं काढली.

मुंबई : मुंबई T20 लीगमध्ये अर्जुन तेंडुलकरने वादळी खेळी केली. त्याने ऑलराऊंडर परफॉर्मन्स दाखवत प्लेयर ऑफ द मॅचचा पुरस्कार जिंकला. ज्या अर्जुनला लखनऊ सुपर जायंट्सने IPL 2026 चा संपूर्ण सीजन बेंचवर बसवून ठेवलं, तोच मुलगा आता मुंबई टी20 लीग गाजवतोय. आपल्या धमाकेदार खेळाने अर्जुनने सर्वांच लक्ष वेधून घेतलं. अर्जुन मुंबई T20 लीगमध्ये ARCS अंधेरी टीमचा भाग आहे. वांद्रे ब्लास्टर्स विरुद्ध खेळताना त्याने गोलंदाजीतही चमकदार प्रदर्शन केलं. तीन षटकात 11 धावा देत 3 विकेट काढल्या. यात एक मेडन ओव्हर होती. अर्जुनने 34 चेंडूत धमाकेदार 64 धावा फटकावल्या. आपल्या इनिंगमध्ये त्याने 4 फोर आणि 5 सिक्स मारले. अर्जुनने 194.12 च्या स्ट्राइक रेटने फलंदाजी करताना आपल्या टीमला विजय मिळवून दिला.

अर्जुनच्या या प्रदर्शनानंतर क्रिकेट फॅन्स सोशल मीडियावर त्याचं भरभरुन कौतुक करत आहेत. प्रामाणिकपणे मेहनत करणाऱ्याला एक दिवस यश नक्की मिळतं अशा पद्धतीच्या लोक कमेंट्स करत आहेत. मुंबई टी20 लीगमध्ये वांद्रे ब्लास्टर्सने पहिली फलंदाजी केली. हा 16 वा सामना होता. त्यांनी 20 ओव्हर्समध्ये 9 विकेट गमावून 144 धावा केल्या. ARCS अंधेरीकडून खेळणाऱ्या अर्जुन तेंडुलकरने गोलंदाजीत कमाल केली. त्याने 3 ओव्हर्समध्ये 11 धावा देऊन तीन विकेट काढल्या.

 

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles