आडाळी एमआयडीसीतील अवैध खनिजाच्या उत्खननाबाबत ठाकरे शिवसेना करणार स्पॉट पंचनामा. ; ….अन्यथा आंदोलनाचाही दिला इशारा.

दोडामार्ग : तालुक्यातील आडाळी एमआयडीसी परिसरात मोठ्या प्रमाणात अवैध खनिज उत्खनन सुरू असून प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत ठाकरेंच्या शिवसेनेने तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. याबाबत सावंतवाडी विधानसभा प्रमुख रूपेश राऊळ, दोडामार्ग तालुकाप्रमुख संजय गवस यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पदाधिकाऱ्यांनी उपविभागीय अधिकारी तथा एमआयडीसी कार्यालय, कुडाळ यांना निवेदन सादर केले आहे.

निवेदनात म्हटले आहे की, दोडामार्ग तालुक्यात उद्योगधंद्यांना चालना देण्याच्या उद्देशाने अनेक वर्षांपूर्वी आडाळी येथे महाराष्ट्र शासनाने एमआयडीसीची स्थापना केली. मात्र, आजतागायत या परिसरात अपेक्षित उद्योगधंदे उभे राहिले नाहीत. त्याऐवजी सपाटीकरणाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात खनिजयुक्त माती व इतर खनिजांचे उत्खनन करून त्याची बाहेर विक्री केली जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

यासंदर्भात प्रशासनाशी अनेक वेळा संपर्क साधूनही कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नसल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. उत्खननासाठी आवश्यक परवानग्या किंवा अधिकृत माहिती उपलब्ध नसतानाही मोठ्या प्रमाणावर खनिज चोरी सुरू असल्याचा आरोपही शिवसेनेने केला आहे.

या प्रकरणाची सखोल चौकशी करून पंचनामा करण्यात यावा, तसेच संपूर्ण परिसराची पाहणी करून अवैध उत्खननावर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

दरम्यान, आमदार महेश सावंत, माजी आमदार तथा जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते आडाळी एमआयडीसी परिसरात जाऊन पाहणी करणार असून अवैध उत्खननास संरक्षण देणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांविरोधात आंदोलन छेडण्यात येणार असल्याचा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.

यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची राहील, असेही निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. यावेळी सावंतवाडी विधानसभा प्रमुख रूपेश राऊळ, दोडामार्ग तालुकाध्यक्ष संजय गवस, सावंतवाडी तालुकाध्यक्ष राजेश शेटकर, उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत कासार, लक्ष्मण आयनोडकर, उप तालुका अध्यक्ष संदेश सावंत, विजय जाधव, प्रेमानंद नाईक,  विनोद काजरेकर, प्रमोद सावंत, गोविंद केरकर, सुनील गावडे, गुरूनाथ नाईक, प्रशांत बुगडे, मंदार नाईक, विनोद ठाकूर, सोमनाथ गवस, भिवा गवस, संजीव पेडणेकर, गोकुळदास मोठे, विष्णू नाईक यांसह उबाठा सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles