सावंतवाडी: जुन्या मुंबई-गोवा महामार्गावर अपघातामुळे वाहतूक विस्कळीत; दोन्ही बाजूंनी वाहनांच्या रांगा
सावंतवाडी : जुन्या मुंबई-गोवा महामार्गावरील इन्सुली कोंडवाडा येथील धोकादायक वळणावर आज कदंबा बस आणि कार यांच्यात समोरासमोर धडक होऊन अपघात झाला. या अपघातात कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. कारमधील प्रवासी किरकोळ धक्क्यातून बचावल्याने मोठा अनर्थ टळला.
मिळालेल्या माहितीनुसार, पणजीहून बेळगावकडे जाणारी कदंबा बस इन्सुली कोंडवाडा येथील वळणावर आली असता समोरून येणाऱ्या बेळगाव येथील कारची तिच्याशी जोरदार धडक झाली. धडकेची तीव्रता इतकी होती की कारच्या पुढील भागाचे मोठे नुकसान झाले.
अपघातानंतर काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. अपघाताची माहिती मिळताच बांदा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली.
सध्या पोलिसांकडून पंचनामा करण्याचे काम सुरू असून अपघाताचे नेमके कारण शोधले जात आहे. दरम्यान, इन्सुली कोंडवाडा परिसरातील वळणावर यापूर्वीही अनेक अपघात घडले असून या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना करण्याची मागणी वाहनचालकांकडून पुन्हा एकदा पुढे येत आहे.
धोकादायक वळण पुन्हा ठरले अपघाताचे कारण, इन्सुली – कोंडवाडा वळणावर कदंबा-कारची समोरासमोर धडक! ; मोठा अनर्थ टळला.
[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]


