भिती होती नेमकं तेच घडलं, अमेरिकेचे इराणवर जोरदार हल्ले! ; डोनाल्ड ट्रम्प यांचा हादरवणारा आदेश.

तेहरान: इराण आणि अमेरिका यांच्यातील संघर्ष पुन्हा वाढला. गेल्या काही दिवसांपासून युद्धसंधी होती. अखेर अमेरिकेने मोठा हल्ला इराणवर केला. युद्धसंधीदरम्यान हा हल्ला अमेरिकेने केला. 28 फेब्रुवारी 2026 पासून युद्धाला सुरूवात झाली. त्यानंतर दोन्ही देशांनी युद्ध थांबवले. युद्धविरामाकरिता चर्चा सुरू होती. मात्र, जगाला ज्याची भीती होती तेच पाऊल अमेरिकेने उचलले आहे. इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्धाच्या ज्वाळा पुन्हा एकदा भडकल्या आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी आता जगातील सर्वात महत्वाचा समुद्रीमार्ग होर्मुज सामुद्रधुनीलाच थेट युद्धाचे मैदान बनवले. डोनाल्ड ट्रम्प गेल्या काही दिवसांपासून इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांना सातत्याने इराणवर हल्ला करण्यापासून रोखत होते. या मुद्दामध्ये त्यांच्यात वादही झाला. मात्र, आता स्वत: डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवर हल्ला करण्याचे आदेश दिले. बेंजामिन नेतान्याहू यांना शांत राहा नाही तर युद्ध भडकेल सांगणारे डोनाल्ड ट्रम्प यांनीच आता इराणवर हल्ल्यांचा भडिमार केला.

अमेरिका आणि इराण यांच्या युद्धविरामासाठी चर्चा सुरू आहे. कालच डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले की, दोन आठवड्यात युद्ध संपेल. मात्र, आता पुन्हा इराणला पेटला आहे. होर्मुजजवळ अपाचे हेलिकॉप्टर पाडल्याने इराणवर हल्ला करण्यात आला. अपाचे हेलिकॉप्टर पाडल्याने डोनाल्ड ट्रम्प यांचा संयम सुटला. मात्र, आता परिस्थिती अधिक चिघळली आहे. अमेरिकेने केलेल्या हल्ल्याचा बदला इराण घेणार आहे.  इराणकडून इशारा देण्यात आला.

इराणविरुद्ध लष्करी प्रत्युत्तर देण्याचे आदेश दिले आहेत. होर्मुझच्या सामुद्रधुनीजवळ अमेरिकेचे ‘एएच-64 अपाचे (AH-64 Apache) हेलिकॉप्टर कोसळले. या घटनेमागे इराणचा हात असल्याचा दावा अमेरिकेने केला. दुसरेकडे अमेरिकेने केलेले हे आरोप इराणने फेटाळून लावले. याचाच बदला म्हणून अमेरिकेने इराणच्या अनेक भागात हल्ले सुरू केले. होर्मुजजवळ अमेरिकेचे हेलिकॉप्टर पडल्यानंतर काही तासातच इराणवर हल्ले सुरू करण्यात आलीत. अमेरिकेच्या लष्कराने इराणच्या महत्वाच्या ठिकाणी हल्ले करण्यास सुरूवात केली. क्षेपणास्त्र आणि हवाई हल्ले सुरू आहेत. अमेरिकेने अब्बाससह इराणमधील तीन ठिकाणांवर एकाच वेळी हल्ले केले. ज्यानंतर पूर्ण इराणमध्ये स्फोटाचे आवाज झाले. अमेरिकेचे हे हल्ले सुरूच राहिले तर याला घातक पद्धतीने उत्तर देऊ, असे इराणने म्हटले. दुसरीकडे तेहरानमध्ये सुरक्षा वाढवण्यात आलीये.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles