अरे बापरे! – ५०० ते ६०० नागरिकांची लष्कराने गोळ्या झाडून केली हत्या! ; पाकव्याप्त काश्मीर जळतोय, थेट तरुणाची धक्कादायक क्लिप.

जम्मू काश्मीर : पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या जम्मू काश्मीरमध्ये मोठा तणाव आहे. लष्कर थेट लोकांना गोळ्या घालत आहे. आतापर्यंत आंदोलन करणाऱ्या 500 ते 700 लोकांना थेट पाकिस्तानच्या सैन्याने गोळ्या घालून ठार केले. पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या जम्मू काश्मीरमध्ये भयंकर स्थिती आहे. लोक रस्त्यावर उतरत आहेत. अशांतता आणि निदर्शनांच्या पार्श्वभूमीवर एका तरुणाने PoJK पोलिसांच्या 9121 या हेल्पलाईनवर केलेल्या कॉलचे ऑडिओ रेकॉर्डिंग व्हायरल झाले. या क्लिपमध्ये तरुण PoJK पोलिसांवर संताप व्यक्त आहे. पाकिस्तान जम्मू काश्मीरमधील स्थिती जगापासून लपून ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, सोशल मीडियावर आता पाकिस्तानची पोलखोल होताना दिसत आहे. दिवसाढवळ्या लोकांना लष्कराकडून गोळ्या घातल्या जात आहेत. लोक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले आहेत. या क्लिपनुसार, त्या एका तरुणाने पाकव्याप्त काश्मीरमधील PoK पोलिसांना थेट आव्हान दिले. त्याने स्पष्ट म्हटले की, जर पूर्ण भागात शांतता आहे, असा दावा तुम्ही करत आहेत मग तुम्ही सोशल मीडियावरील पोस्टवरील कमेंट सेक्शन बंद का ठेवले?

यादरम्यान पाकव्याप्त काश्मीरमधील परिस्थिती सांगताना त्याने पोलिसांना सांगितले की, रावालाकोटसह अजून काही भागात स्थिती गंभीर आहे. पाकिस्तानी काश्मीरींची हत्या केली जात आहे. त्यामध्ये संपूर्ण पाकव्याप्त काश्मीरमध्ये अंशांतता आहे. आतापर्यंत 500 ते 600 लोकांना पाकिस्तानी सैन्याने गोळ्या झाडून मारले आहे. पाकिस्तानी सरकारविरोधात पाकव्याप्त काश्मीरच्या लोकांमध्ये संताप आहे. सैन्याकडून मोठे अत्याचार केले जात आहेत. लोक याविरोधात रस्त्यावर उतरले आहेत. मात्र, त्यांच्यावरील अन्याय काही कमी होत नाहीये.

मुळात म्हणजे पाकव्याप्त काश्मीरमध्ये जनता सरकार, सैन्य आणि पोलिस यांच्याविरोधात रस्त्यावर उतरली. या आंदोलन शांततेने घेण्याऐवजी थेट लोकांवर गोळ्या झाडण्यात आल्या. मोठे अत्याचार करण्यात आली. स्थिती बिघडल्याचे लक्षात येताच सरकारने थेट लष्कराच्या हातात सर्वकाही दिले. आंदोलन करणाऱ्या लोकांवर गोळी झाडण्यात आल्या. स्थिती नियंत्रणात येण्याऐवजी अधिक बिकड झाल्याचे बघायला मिळत आहे. पुन्हा एकदा पाकिस्तान पेटल्याचे यावरून दिसत आहे. मात्र, जगापासून पाकिस्तान यावर गोष्टी लपवून ठेवतोय.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles