सावंतवाडी : राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी करणारा सावंतवाडीतील युवा बुद्धिबळपटू बाळकृष्ण कौस्तुभ पेडणेकर याचा सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसच्या वतीने सत्कार करण्यात आला. नवनियुक्त जिल्हाध्यक्ष अरविंद मोंडकर यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन त्याचा गौरव करण्यात आला.
जिल्हा काँग्रेस व सावंतवाडी तालुका काँग्रेस यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात ज्येष्ठ नेते ॲड. दिलीप नार्वेकर, प्रदेश सरचिटणीस साईनाथ चव्हाण, महिला जिल्हाध्यक्षा साक्षी वंजारी, प्रदेश सेवादल अध्यक्ष अजिंक्य गावडे, युवक जिल्हाध्यक्ष किरण टेंबुलकर, जिल्हा उपाध्यक्ष मेघनाद धुरी, ओबीसी सचिव अमिदी मेस्त्री, तालुकाध्यक्ष अभय मालवणकर, रवींद्र म्हापसेकर, राजू मसुरकर, नागेश मोरये आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना श्री. मोंडकर यांनी बाळकृष्णच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील यशाचे कौतुक केले. त्याची कामगिरी जिल्ह्यासाठी अभिमानास्पद असल्याचे सांगत खेळाच्या माध्यमातून मुलांसाठी विविध उपक्रम राबविण्याचा मानस व्यक्त केला.
बाळकृष्णचे वडील कौस्तुभ पेडणेकर यांनी गेल्या दहा वर्षांतील त्याच्या जिल्हा, राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांमधील यशस्वी वाटचालीची माहिती दिली. तसेच मुलांसाठी विविध क्रीडा व शैक्षणिक उपक्रम राबविणाऱ्या मुक्ताई अकॅडमीच्या कार्याचेही उपस्थितांनी कौतुक केले.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित मान्यवरांनी बाळकृष्णला पुढील स्पर्धात्मक वाटचालीसाठी शुभेच्छा देत त्याच्या उज्ज्वल भवितव्याचा विश्वास व्यक्त केला.
सावंतवाडीचा राष्ट्रीय बुद्धिबळपटू बाळकृष्ण पेडणेकरचा काँग्रेसकडून गौरव!
[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]


