तब्बल १००० विद्यार्थ्यांच्या भविष्याला नवे पंख! ; कोकण कला व शिक्षण संस्थेचा शिक्षणासाठी हातभार! ; सावंतवाडीत शालेय साहित्य किट वाटपाचा भव्य सोहळा संपन्न.

सावंतवाडी : सामाजिक बांधिलकी जपत शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी कार्यरत असलेल्या कोकण कला व शिक्षण विकास संस्था (कोकण एनजीओ इंडिया) यांच्या वतीने श्री पंचम खेमराज महाविद्यालय, सावंतवाडी येथे १००० हून अधिक गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य किटचे भव्य वाटप करण्यात आले. नव्या शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवणारा हा उपक्रम विशेष ठरला.
या शालेय साहित्य किटमध्ये दप्तर, वह्या, पेन, पेन्सिल, ज्योमेट्री बॉक्स, रंगसाहित्य तसेच इतर आवश्यक शैक्षणिक वस्तूंचा समावेश करण्यात आला होता. आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षणासाठी आवश्यक साहित्य खरेदी करणे कठीण ठरणाऱ्या विद्यार्थ्यांना या उपक्रमामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.
कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण व्हावी, त्यांचा आत्मविश्वास वाढावा आणि कोणताही विद्यार्थी केवळ आर्थिक अडचणींमुळे शिक्षणापासून वंचित राहू नये, हा संस्थेचा प्रमुख हेतू असल्याचे मान्यवरांनी यावेळी सांगितले.
या कार्यक्रमाला सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण व आरोग्य सभापती प्रितेश राऊळ, सावंतवाडी नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोसले, संस्थेचे अध्यक्ष दयानंद कुबल, संध्या तेरसे, माजी प्राचार्य अन्वर खान, सतीश बागवे, पत्रकार संघ अध्यक्ष सचिन रेडकर, प्रेरणादायी व्याख्याते प्रा. रुपेश पाटील, पत्रकार अमोल टेमकर, विनायक गांवस, साबाजी परब, भुवन नाईक, कवी दीपक पाटेकर, अर्पिता वाटवे, वामन तर्फे, ॲड. सिद्धार्थ भांबुरे, ललित हरमलकर, तारा सांगळे, सागर कुबल, रामचंद्र पाटील, रवी जाधव, शोभराज शेर्लेकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली.


कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सुरज कदम, प्रथमेश सावंत, प्रीती पांगे, साक्षी पोटे, हर्षला कोल्हे, नूतन कदम, नव्या पाटील, सागर केवारी, अमोल गुरम, समीर शिर्के आदी पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद, पालकांच्या डोळ्यांतील समाधान आणि समाजातील दातृत्वाची भावना यांचा सुंदर संगम या उपक्रमातून अनुभवायला मिळाला. “एक किट… एक संधी… आणि हजारो स्वप्नांना नवी उभारी!” अशी भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles