‘एक पेड माँ के नाम’ अभियानातून धर्मसंवर्धनासह निसर्गसंवर्धनाचा संदेश. ; भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना (बाळू) देसाई यांच्या पुढाकाराने वृक्षारोपण.

वेंगुर्ले : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘एक पेड माँ के नाम’ या अभियानाला प्रतिसाद देत मातोंड येथे भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना (बाळू) देसाई यांच्या पुढाकाराने वृक्षारोपण करण्यात आले. हिंदू संमेलनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित या उपक्रमातून धर्मसंवर्धनाबरोबरच निसर्गसंवर्धनाचाही संदेश देण्यात आला.
यावेळी प्रसन्ना देसाई यांनी जिल्ह्यातील विविध मंडळांमध्ये वृक्षारोपण मोहीम राबविण्यात येत असल्याची माहिती दिली. ‘आईसाठी एक झाड लावा’ या संकल्पनेला प्रतिसाद देत पर्यावरण संरक्षणासाठी प्रत्येकाने पुढाकार घेण्याचे आवाहन त्यांनी केले.


कार्यक्रमाच्या प्रारंभी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
या प्रसंगी मातोंडच्या सरपंच मयुरी वडाचेपाटकर, सोशल मीडिया प्रमुख श्रीकृष्ण (राजू) परब, पत्रकार तथा ग्रामपंचायत सदस्य दिपेश परब व राहुल प्रभू, ग्रामपंचायत सदस्या किशोरी परब व सुजाता सावंत, वेताळ प्रतिष्ठानचे सचिन परुळेकर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे बाबुराव खवणेकर तसेच किशोर परब, अनिल परब, श्रीकांत परब, संतोष सावंत, प्रदीप जबडे, वसंत खाजणेकर, संतोष परब आणि अविनाश परब आदी हिंदुत्ववादी कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles