सिंधुदुर्ग : जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर अखेर जिल्हा परिषद प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या हिताचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. सिंधुदुर्गातील सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा १९ जून ते ३० जून २०२६ या कालावधीत सकाळच्या सत्रात भरविण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना तीव्र उष्णतेपासून मोठा दिलासा मिळणार आहे.
माध्यमिक शिक्षणाधिकारी किंजवडेकर यांनी यासंदर्भातील लेखी आदेश काढले असून, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांच्या निर्देशानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. आदेशानुसार जिल्ह्यातील सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा सकाळी ७.३० ते ११.३० या वेळेत भरविण्यात येणार आहेत.
गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात तापमानात लक्षणीय वाढ झाली असून दुपारच्या वेळेत शाळा भरत असल्याने विद्यार्थ्यांना घरातून शाळेत ये-जा करताना तसेच वर्गांमध्ये शिक्षण घेताना उष्णतेचा मोठा त्रास सहन करावा लागत होता. विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर याचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेऊन विविध स्तरांतून सकाळच्या सत्राची मागणी करण्यात आली होती.
या निर्णयासाठी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, शिक्षण व आरोग्य सभापती प्रितेश राऊळ, जिल्हा परिषद सदस्य रूपेश पावसकर तसेच महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. विद्यार्थ्यांच्या आरोग्याला प्राधान्य देत शाळांचे वेळापत्रक बदलण्याची मागणी प्रशासनाकडे वारंवार करण्यात आली होती. अखेर या प्रयत्नांना यश आले असून प्रशासनाने सकारात्मक निर्णय घेतला आहे.
दरम्यान, या निर्णयाचे पालक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांकडून स्वागत करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देणारा हा निर्णय असल्याची प्रतिक्रिया विविध स्तरांतून व्यक्त होत आहे.
याबाबत महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, उपाध्यक्ष दादा साईल, शिक्षण सभापती प्रितेश राऊळ, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, जिल्हा परिषद सदस्य रूपेश पावसकर, माध्यमिक शिक्षणाधिकारी किंजवडेकर तसेच मराठा शिक्षक संघटना, कास्ट्राईब शिक्षक संघटना आणि शिक्षक भारती यांचे आभार मानले आहेत.
महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने सुरुवातीपासूनच सकाळच्या सत्रासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने घेतलेल्या या निर्णयाबद्दल जिल्हा परिषद प्रशासनाचे परिषदेने विशेष आभार व्यक्त केले आहेत.
👉 १९ जून ते ३० जूनपर्यंत शाळांची वेळ : सकाळी ७.३० ते ११.३०
👉 उष्णतेपासून विद्यार्थ्यांना दिलासा; पालक-शिक्षकांकडून निर्णयाचे स्वागत
अखेर उष्णतेसमोर प्रशासन झुकले!, सिंधुदुर्गातील शाळा उद्यापासून सकाळच्या सत्रात. ; महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या पाठपुराव्याला यश, १९ ते ३० जूनदरम्यान सकाळी ७.३० ते ११.३० या वेळेत शाळा भरणार!
[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]



