..तर अर्ध्या तासात महाजन फुटणार! ; संजय राऊतांच्या दाव्यावर गिरीश महाजनांचा जोरदार पलटवार!

मुंबई : राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापल्याचे चित्र दिसत आहे. खासदार संजय राऊत यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्यावर टीका करताना आक्षेपार्ह भाषा वापरल्याचा आरोप होत आहे. यावर आता गिरीश महाजन यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

गिरीश महाजन म्हणाले की, “माझ्याकडे कोणतीही Z किंवा Y दर्जाची सुरक्षा नाही. माझ्यासोबत फक्त एकच कॉन्स्टेबल असतो. गेल्या 35 वर्षांपासून मी मंत्री झाल्यानंतर शासनाला पत्र देऊन सुरक्षा नको असल्याचे सांगत आलो आहे. राज्यातील सुरक्षा नाकारणारा मी एकमेव मंत्री आहे.”

संजय राऊत यांच्या “इडी सीबीआय हातात आली तर फोडून काढू!” या वक्तव्यावर बोलताना महाजन म्हणाले, “ताब्यात घ्यायला केंद्रात शासन लागेल. त्यासाठी उद्धव ठाकरे यांना केंद्रात यावं लागेल. मग त्यांनी शासन ताब्यात घ्यावं आणि फोडावं.”

तसेच त्यांनी ऑपरेशन टायगरशी आपला कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट केले. “पूर्वी बाळासाहेब ठाकरे यांच्या एका शब्दावर लोक धावत यायचे. त्यांचा शब्द… म्हणजे महाराष्ट्राचा शब्द होता. त्यांच्या हाकेवर महारष्ट्र हालायचं… आता मात्र खासदार, आमदार आणि नगरसेवकही पक्ष सोडत आहेत,” असा टोलाही त्यांनी लगावला.

 

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles