मायनिंग हटवा अन् कोकण वाचवा! – आजगाव ते आरवली मायनिंगविरोधी २३ जून रोजी जनजागृती रॅली. ; नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन.

सावंतवाडी : कोकणातील पर्यावरण, शेती, जलस्रोत आणि स्थानिक जनजीवनावर होणाऱ्या संभाव्य परिणामांच्या पार्श्वभूमीवर मायनिंगविरोधी लढ्याला अधिक बळ देण्यासाठी आजगाव दशक्रोशी मायनिंग विरोधी संघर्ष समितीच्या वतीने मंगळवार, २३ जून २०२६ रोजी भव्य जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.
ही रॅली सायंकाळी ४ वाजता श्री देव वेतोबा मंदिर, आजगाव येथून सुरू होणार असून शिरोडा मार्गे श्री देव वेतोबा मंदिर, आरवली येथे पोहोचणार आहे. रॅलीनंतर आरवली येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले असून सभेनंतर कार्यक्रमाचा समारोप होणार आहे.
संघर्ष समितीच्या वतीने परिसरातील ग्रामस्थ, युवक, महिला, शेतकरी, व्यापारी आणि पर्यावरणप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून मायनिंगविरोधी जनआंदोलनाला पाठिंबा द्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, कोकणातील निसर्गसंपदा, सुपीक शेती, जलस्रोत आणि भावी पिढ्यांचे पर्यावरणीय हित जपण्यासाठी हा लढा सुरू असून जनजागृती रॅलीच्या माध्यमातून नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

यावेळी “कोकण वाचवा – मायनिंग हटवा”, “निसर्ग, शेती आणि पर्यावरणाच्या रक्षणासाठी एकत्र या” अशा घोषणांनी परिसर दणाणून जाणार असल्याचे समितीने म्हटले आहे.

प्रमुख घोषणा –
🔸 कोकण वाचवा – मायनिंग हटवा!
🔸 निसर्ग, शेती आणि पर्यावरणाच्या रक्षणासाठी एकत्र या!
🔸 जनतेच्या हक्कासाठी संघर्ष अधिक तीव्र करा!
आजगाव दशक्रोशी मायनिंग विरोधी संघर्ष समितीने सर्व नागरिकांना वेळेवर उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles