“कार्यकर्त्यांच्या आनंदात आनंद मानणारा हक्काचा युवा नेता!” – लग्न सोहळ्यांत भाजपा राज्य युवा नेते विशाल परब यांच्या उपस्थितीमुळे युवा कार्यकर्त्यांना मिळतेय आपुलकीची उब!

सावंतवाडी : राजकारणात अनेक नेते कार्यकर्त्यांच्या खांद्यावर उभे राहतात; मात्र कार्यकर्त्यांच्या सुख-दुःखात स्वतःहून सहभागी होणारे नेते फारच कमी असतात. भारतीय जनता पक्षाचे राज्य युवा नेते विशाल परब यांनी हीच वेगळी ओळख निर्माण केली आहे. कार्यकर्त्यांच्या अडचणीच्या काळात धावून जाणारे आणि त्यांच्या आनंदाच्या क्षणांनाही तितक्याच आत्मीयतेने उपस्थित राहणारे नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते.

सध्या लग्नसराईचा हंगाम सुरू असून भाजपच्या युवा कार्यकर्त्यांपासून ते विविध पदाधिकाऱ्यांच्या विवाह सोहळ्यांमध्ये विशाल परब आवर्जून उपस्थित राहत आहेत. व्यस्त राजकीय दिनक्रमातून वेळ काढून ते नववधू-वरांना शुभेच्छा देत असून कुटुंबीयांशीही संवाद साधत आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये एक वेगळाच आत्मीयतेचा भाव निर्माण होत आहे.

विशाल परब यांची उपस्थिती ही केवळ एका नेत्याची उपस्थिती नसून ती कुटुंबातील ज्येष्ठ सदस्याच्या आशीर्वादासारखी वाटते, अशी भावना अनेक युवा कार्यकर्ते व्यक्त करत आहेत. कार्यकर्त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या क्षणांमध्ये सहभागी होऊन त्यांच्याशी जपलेले हे नाते अधिक दृढ होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

राजकीय संघटनांमध्ये कार्यकर्ते हेच खरे बळ मानले जाते. त्या कार्यकर्त्यांच्या आनंदात सहभागी होत त्यांना प्रोत्साहन देण्याचे काम विशाल परब सातत्याने करत असल्याने युवा वर्गामध्ये त्यांच्याबद्दलचा आदर आणि विश्वास अधिक वाढत आहे. त्यांच्या या आपुलकीच्या स्वभावामुळे कार्यकर्त्यांना नवी ऊर्जा, प्रेरणा आणि आपलेपणाची भावना मिळत असून “नेता असावा तर असा” अशा प्रतिक्रिया विविध स्तरांतून उमटत आहेत.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles