सातार्डा चेकपोस्टवर गोवा बनावटीच्या दारूसह टेम्पो ट्रॅव्हलर जप्त.

सावंतवाडी : गोव्यातून रत्नागिरीकडे बेकायदा दारूची वाहतूक करणाऱ्या टेम्पो ट्रॅव्हलरवर सातार्डा चेकपोस्ट येथे कारवाई करत पोलिसांनी १५ लाख ४० हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी एका संशयिताविरुद्ध दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जितेंद्र प्रवीण मयेकर (वय ३०, रा. अडूर, ता. गुहागर, जि. रत्नागिरी) हा आपल्या ताब्यातील एमएच ०८ बीके ८१८१ क्रमांकाच्या टेम्पो ट्रॅव्हलरमधून गोवा बनावटीची विविध ब्रँडची दारू गोव्यातून रत्नागिरीकडे वाहतूक करत होता. सातार्डा चेकपोस्ट येथे वाहनाची तपासणी केली असता वाहनातून ४० हजार ७०० रुपये किमतीची दारू आढळून आली.

या कारवाईत पोलिसांनी १५ लाख रुपये किमतीचा टेम्पो ट्रॅव्हलर व ४० हजार ७०० रुपये किमतीची दारू असा एकूण १५ लाख ४० हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी संशयिताविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस उपनिरीक्षक श्रीरंग टाकेकर व पोलीस कॉन्स्टेबल बर्गे यांनी केली. पुढील तपास सुरू आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles