वाढदिवसाचा जल्लोष नव्हे, विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी ज्ञानाची भेट! ; पालक मंत्री नितेश राणेंच्या वाढदिवसानिमित्त विक्रांत सावंतांचा आदर्श उपक्रम!, विद्यार्थ्यांना कंपास पेट्यांचे वाटप.

✍️ रूपेश पाटील.

सावंतवाडी : राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त माजगाव जिल्हा परिषद मतदारसंघात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. याच उपक्रमांतर्गत जिल्हा परिषद सदस्य विक्रांत सावंत यांच्या पुढाकारातून ओटवणे येथील चारही शाळांमधील चौथी व सातवीच्या विद्यार्थ्यांना दर्जेदार कंपास पेट्यांचे वाटप करण्यात आले.

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीला हातभार लावणाऱ्या या उपक्रमाचे शिक्षक, पालक आणि ग्रामस्थांकडून विशेष कौतुक करण्यात आले. कार्यक्रमास पंचायत समिती सदस्य उत्कर्ष गावकर, भाजप शक्ती केंद्र प्रमुख तथा ग्रामपंचायत सदस्य प्रशांत बुराण, विश्वनाथ बोर्ये, शिवसेना विभाग प्रमुख उमेश गावकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

यावेळी शिक्षकवृंदांनी पालकमंत्री ना. नितेश राणे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना, वाढदिवसाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केल्याबद्दल जिल्हा परिषद सदस्य विक्रांत सावंत यांचे विशेष आभार मानले. तसेच त्यांच्या भावी सामाजिक आणि राजकीय वाटचालीस शुभेच्छा व्यक्त केल्या.

जिल्हाभर पालकमंत्री ना. नितेश राणे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा होत असताना, माजगाव जिल्हा परिषद मतदारसंघात विक्रांत सावंत आणि मित्रमंडळाच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपणारे विविध उपक्रम राबवून वाढदिवसाला वेगळे आणि विधायक स्वरूप देण्यात आले.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles