कुडाळ: सिंधुदुर्गचे पालकमंत्री तथा मत्स्यव्यवसाय व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त भाजप राज्य युवा नेते विशाल परब यांच्या पुढाकारातून बेनगाव-माणगाव येथील इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये विद्यार्थ्यांना विविध खेळण्यांचे वाटप करण्यात आले.
या उपक्रमामुळे चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला. यावेळी युवा नेते विशाल परब यांनी नितेश राणे यांनी शिक्षण व सामाजिक क्षेत्रात दिलेल्या योगदानाचा गौरव करत, वाढदिवस समाजोपयोगी उपक्रमांद्वारे साजरा करण्याचा संदेश दिला.
कार्यक्रमास संस्थेचे सचिव साईनाथ नार्वेकर, शिक्षकवृंद, पालक व विद्यार्थी उपस्थित होते. सामाजिक बांधिलकी आणि बालमनांप्रती जिव्हाळा व्यक्त करणारा हा उपक्रम उपस्थितांच्या कौतुकाचा विषय ठरला.



