पालक मंत्री नितेश राणेंच्या वाढदिनी चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर हास्याची भेट! ; भाजपा युवा नेते विशाल परब यांच्याकडून खेळण्यांचे वाटप उपक्रम हृदयाला भिडला थेट!

कुडाळ : वाढदिवस म्हणजे केवळ शुभेच्छांचा वर्षाव, फलकबाजी किंवा जल्लोष नसतो, तर समाजातील वंचित, गरजू आणि चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्याची संधी असते, याचे सुंदर उदाहरण भाजपचे युवा नेते विशाल परब यांनी घालून दिले. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री तथा मत्स्यव्यवसाय आणि बंदर विकास मंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून माणगाव पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ, माणगाव संचलित इंग्लिश मीडियम स्कूल, बेनगाव-माणगाव येथे विद्यार्थ्यांना विविध खेळण्यांचे वाटप करण्यात आले.विशाल परब यांच्या पुढाकारातून आणि दातृत्वातून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमामुळे शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांना आनंदाची अनमोल भेट मिळाली. रंगीबेरंगी, शैक्षणिक आणि मनोरंजनात्मक खेळणी मिळताच विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमटलेले निरागस हास्य आणि डोळ्यांतील चमक हेच या उपक्रमाचे खरे यश ठरले.

या उपक्रमामुळे चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला. यावेळी युवा नेते विशाल परब यांनी नितेश राणे यांनी शिक्षण व सामाजिक क्षेत्रात दिलेल्या योगदानाचा गौरव करत, वाढदिवस समाजोपयोगी उपक्रमांद्वारे साजरा करण्याचा संदेश दिला.

“पालक मंत्री नितेश राणे यांनी माणगाव हायस्कूल आणि परिसरातील शैक्षणिक संस्थांना यापूर्वीही वेळोवेळी भरभरून मदत केली आहे. शिक्षण, क्रीडा, सामाजिक आणि विकासकामांच्या माध्यमातून त्यांनी नेहमीच विद्यार्थ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची भूमिका घेतली आहे. समाजातील प्रत्येक घटकाप्रती त्यांची असलेली संवेदनशीलता आणि बांधिलकी आम्हा कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी आहे,” असे गौरवोद्गार विशाल परब यांनी काढले.
“वाढदिवस हा केवळ शुभेच्छा स्वीकारण्याचा दिवस नसून, समाजाला काहीतरी देण्याचा आणि इतरांच्या आयुष्यात आनंद निर्माण करण्याचा संकल्प करण्याचा दिवस असावा,” अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

कार्यक्रमास संस्थेचे सचिव साईनाथ नार्वेकर, शिक्षकवृंद, पालक व विद्यार्थी उपस्थित होते. सामाजिक बांधिलकी आणि बालमनांप्रती जिव्हाळा व्यक्त करणारा हा उपक्रम उपस्थितांच्या कौतुकाचा विषय ठरला.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles