आरोंदा प्रशालेत जिजाऊ सामाजिक व शैक्षणिक संस्थेच्या वतीने वह्या वाटप.

सावंतवाडी : कोकणातील पाचही जिल्ह्यात गेल्या वीस वर्षांहून जास्त काळ शिक्षण,आरोग्य, रोजगार, प्रशिक्षण व महिला सबलीकरण अशा विविध क्षेञात जिजाऊ सामाजिक व शैक्षणिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेश सांबरे यांच्या माध्यमातून समाजाभिमुख काम सुरू आहे. अटल प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष व जिजाऊ परिवाराचे सदस्य ॲड. नकुल पार्सेकर यांच्या प्रयत्नातून दोडामार्ग व सावंतवाडी तालुक्यातील काही ग्रामीण शाळांमध्ये वह्या वाटपाचा कार्यक्रम हाती घेतलेला असून गेल्यावर्षी या दोन्ही तालुक्यात सुमारे तीस हजारांहून जास्त वह्यांचे वाटप करण्यात आले होते.यावर्षीही हा उपक्रम काही निवडक शाळांमध्ये राबवण्यात येत आहे. त्या अनुषंगाने
आरोंदा हायस्कूल मधील विद्यार्थ्यांना वह्पा वाटपाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी ॲड. पार्सेकर यानी सामाजिक कार्यकर्ते निलेश सांबरे याच्या सामाजिक कामाचा आढावा घेऊन भविष्यात जिल्ह्यात जिजाऊ संस्थेमार्फत काही समाजाभिमुख उपक्रम राबविणार असल्याचे सांगितले. यावेळी अटल प्रतिष्ठानचे कार्यवाह व आरोंदा गावचे सुपुत्र रघुनाथ तानावडे, आरोंदा शिक्षण संस्थेचे कार्यवाह भाई देऊलकर, शाळेचे मुख्याध्यापक सिद्धार्थ तांबे, सहशिक्षक ताराचंद राठोड, सौ.भावना माजगावंकर, सौ. सुप्रिया कोरगावकर, श्रीकृष्ण गावडे, श्री. वसावे आदि मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंदन गोसावी यांनी तर आभार प्रदर्शन मुख्याध्यापक सिद्धार्थ तांबे यांनी केले.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles