सावंतवाडी : सिंधुदुर्ग साहित्य संघ आणि श्रीराम वाचन मंदिर, सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने कोजागरी कवी संमेलन २०२४ ज्येष्ठ मालवणी कवी दादा मडकईकर यांच्या अध्यक्षतेखाली शनिवार १९ ऑक्टोबर रोजी आयोजित केले आहे. श्रीराम वाचन मंदिरच्या कविवर्य केशवसुत सभागृहात सायंकाळी ६.३० वाजता होणाऱया या संमेलनासाठी साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त अनुवादक व कवी बलवंत जेऊलकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
या संमेलनात निमंत्रित कवी म्हणून प्रभाकर भागवत, उषा परब, डॉ. अनिल धाकू कांबळी, शरयू आसोलकर, संध्या तांबे, वीरधवल परब, अजय कांडर, नामदेव गवळी, मोहन कुंभार, डॉ. गोविंद काजरेकर, कल्पना बांदेकर, अंकुश कदम, सिद्धार्थ तांबे, मृण्मयी बांदेकर, अरुण नाईक, सरिता पवार, रमेश सावंत, स्नेहा कदम, सफर अली व अन्य कवी यांचा सहभाग राहणार आहे.
संमेलनात सहभागी कवींपैकी एक कवीच्या उत्कृष्ट कवितेला कवी वसंत सावंत पुरस्कार व नवोदीत कवीला उत्कृष्ट कवी पुरस्कार दिला जाणार आहे. या संमलेनात सहभागी व्हावे, असे आवाहन सिंधुदुर्ग साहित्य संघाचे अध्यक्ष लीलाधर घाडी, कार्यवाह मनोहर परब यांनी केले आहे.