जिल्हा गुणवत्ता यादीत स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलचा दबदबा! ; चार विद्यार्थ्यांची उल्लेखनीय कामगिरी.

सावंतवाडी : स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी CBSE इंग्रजी माध्यमाच्या पूर्व उच्च प्राथमिक (Pre Upper Primary) शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत जिल्ह्याच्या विशेष प्राविण्य गुणवत्ता यादीत मानाचे स्थान मिळवले आहे. विद्यार्थ्यांच्या या घवघवीत यशामुळे शाळा, पालक आणि शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या परीक्षेत शाळेच्या चार विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरावर उत्कृष्ट गुणवत्ता सिद्ध केली. त्यामध्ये इयत्ता सहावीतील कु. कुशल तांडेल याने जिल्ह्यात तृतीय क्रमांक, कु. जान्हवी सावंत हिने दहावा क्रमांक, कु. सई नाईक हिने तेरावा क्रमांक, तर कु. वरद सावंत याने तेविसावा क्रमांक मिळवत शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला.
विद्यार्थ्यांच्या या यशामागे त्यांची अथक मेहनत, सातत्यपूर्ण अभ्यास, पालकांचे मोलाचे सहकार्य आणि शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन असल्याचे शाळा व्यवस्थापनाने सांगितले. विद्यार्थ्यांनी आपल्या जिद्द, चिकाटी आणि परिश्रमाच्या जोरावर हे यश संपादन करत इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे.
या उल्लेखनीय यशाबद्दल शाळेचे संचालक श्री. रुजुल पाटणकर, मुख्याध्यापिका सौ. प्राची साळगावकर तसेच सर्व शिक्षकवृंद यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल शैक्षणिक भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. भविष्यातही शाळेचे विद्यार्थी विविध शैक्षणिक क्षेत्रांत अशीच उल्लेखनीय कामगिरी करत शाळेचा नावलौकिक वाढवतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles