मिलाग्रीस हायस्कूलची पोरं लई हुशार, शिष्यवृत्ती परीक्षेत कामगिरी दमदार! ; जिल्हा गुणवत्ता यादीत तब्बल ८ विद्यार्थ्यांचा झेंडा!

सावंतवाडी :  सावंतवाडी येथील मिलाग्रीस हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे आयोजित शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत जिल्हा गुणवत्ता यादीत आपला ठसा उमटवला आहे. माध्यमिक आणि प्राथमिक अशा दोन्ही स्तरांवर मिळालेल्या या यशामुळे शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

इयत्ता आठवी (पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती) परीक्षेत कुमार शुभंकर सुदीप पाटकर याने जिल्ह्यात ६ वा क्रमांक मिळवत शाळेचे नाव उज्ज्वल केले. कुमारी जान्हवी सुरेश गवंडे हिने २१ वा, कुमार अमितेश अरुण राऊळ याने २४ वा, तर कुमारी तेजल बाबुराव जाधव हिने ४९ वा क्रमांक पटकावत उल्लेखनीय यश मिळवले.

इयत्ता पाचवी (प्राथमिक शिष्यवृत्ती) परीक्षेतही विद्यार्थ्यांनी दमदार कामगिरी केली. सुरेश मंगेश वरक याने ८ वा, मयुरेश राकेश मोर्ये याने ९ वा, अधीश सुधीर पास्ते याने ४१ वा, तर वीर वामनराव राऊळ याने ५१ वा क्रमांक मिळवून शाळेच्या यशात मानाची भर घातली.

विद्यार्थ्यांच्या या दैदिप्यमान यशाबद्दल प्राचार्य फादर रिचर्ड सालढाणा यांनी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करत अभिनंदन केले. तसेच त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.

विद्यार्थ्यांचे हे यश त्यांच्या कठोर परिश्रमाचे, शिक्षकांच्या दर्जेदार मार्गदर्शनाचे आणि पालकांच्या भक्कम पाठबळाचे फलित असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. या उल्लेखनीय कामगिरीमुळे मिलाग्रीस हायस्कूलचा शैक्षणिक लौकिक पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles