सावंतवाडी नगराध्यक्ष चषक कॅरम स्पर्धा उत्साहात संपन्न! ; आ. दीपक केसरकर, नगराध्यक्षा श्रध्दाराजे भोंसले यांच्या हस्ते बक्षीस वितरण.

सावंतवाडी : श्रीमंत बापूसाहेब महाराज यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सावंतवाडी नगरपरिषदेने आयोजित केलेल्या जिल्हा स्तरीय ‘नगराध्यक्ष चषक २०२६’ कॅरम स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा नुकताच उत्साहात संपन्न झाला. या स्पर्धेत मिलाग्रिस हायस्कूलची कु. आस्था लोंढे हिने १८ वर्षांखालील मुलींच्या गटात द्वितीय (दुसरा) क्रमांक पटकावला.
​स्पर्धेचे बक्षीस वितरण आमदार दीपक केसरकर आणि नगराध्यक्षा सौ. श्रद्धाराजे भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी मुख्याधिकारी विनायक औंधकर,पंचायत समितीच्या सभापती सुष्मिता जाधव, सभापती सुधीर आरीवडेकर, सभापती आनंद नेवगी, सभापती प्रतीक बांदेकर, सभापती दिपाली भालेकर आणि नगरसेवक शर्वरी धारगळकर,निलम नाईक, दुलारी रांगणेकर, स्नेहा नाईक आदी उपस्थित होते.

 ​या स्पर्धेतील विविध गटांचे अंतिम निकाल पुढीलप्रमाणे – 
​खुला गट (एकरी) मध्ये देवगडच्या विकास कुलकर्णी याने प्रथम, तर सावंतवाडीच्या अमूल्य घाडी याने द्वितीय क्रमांक मिळवला. खुला गट (दुहेरी) मध्ये ओंकार कुबल व उमेश लोहार या जोडीने प्रथम, तर सचिन घाडी व गौतम यादव या जोडीने द्वितीय क्रमांक पटकावला.
​१४ वर्षांखालील मुलांच्या गटात सावंतवाडीचा भरत सावंत प्रथम तर कणकवलीचा चैतन्य लोहार द्वितीय आला. १४ वर्षांखालील मुलींच्या गटात कणकवलीची दिव्या राणे प्रथम तर मीरा आपटे द्वितीय आली. १६ वर्षांखालील मुलांच्या गटात सावंतवाडीच्या अमूल्य घाडी याने प्रथम तर भावेश कुडतरकर याने द्वितीय क्रमांक मिळवला. १८ वर्षांखालील मुलींच्या गटात कळसुलकरची साक्षी रामदूरकर हिने प्रथम तर मिलाग्रीसची आस्था लोंढे हिने द्वितीय क्रमांक पटकावला. सर्व विजेत्या खेळाडूंचे मान्यवरांनी कौतुक केले.

 

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles