आ. केसरकरांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रमांचे आयोजन. ; शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांची माहिती.

सावंतवाडी : माजी शालेय शिक्षण मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेनेच्यावतीने सावंतवाडी तालुक्यांमध्ये विविध सामाजिक उपयोगी कार्यक्रम घेण्यात येणार असून वाढदिवस सामाजिक कार्यातून साजरा केला जाणार असल्याची माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी आज येथे दिली.

श्री परब म्हणाले, येत्या 18 जुलै रोजी आमदार केसरकर यांचा वाढदिवस साजरा होत आहे. यानिमित्त सावंतवाडी तालुक्यातील नगरसेवक पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या माध्यमातून विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये नगरसेवक देव्या सूर्याजी यांच्या युवा रक्तदाता संघटनेच्या माध्यमातून रक्तदान शिबिर त्याचबरोबर महिला वर्गांकडून रुग्णालयामध्ये फळ वाटप अंध बांधवांना मदत गरजू लोकांना छत्र्या वाटप तसेच शालेय विद्यार्थ्यांना वह्या वाटपाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. आम. केसरकर हे स्वतः या कार्यक्रमाला उपस्थित रहावे अशी आम्ही त्यांच्याकडे मागणी केली असून यांच्या उपस्थितीत वाढदिवसाच्या कार्यक्रम धुमधडाक्यात साजरा केला जाईल असे ते म्हणाले.

यावेळी शिवसेनेचे शहरप्रमुख तथा नगरसेवक बाबू कुडतरकर, नगरसेवक अजय गोंदावळे, नगरसेवक देव्या सूर्याजी, नगरसेविका ॲड. सायली दुभाषी, नगरसेवक शर्वरी द धारगळकर,  स्नेहा नाईक आदी उपस्थित होते.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles