विद्यार्थी दशेतच नेतृत्व अन् शिस्तीचा संस्कार! ; निरवडेच्या संस्कार इंटरनॅशनल स्कूलमध्ये शालेय विद्यार्थी परिषद निवडणूक संपन्न.

सावंतवाडी: तालुक्यातील निरवडे येथील संस्कार नॅशनल स्कूलमध्ये विद्यार्थी परिषद निवडणूक उत्साहात व लोकशाही पद्धतीने पार पडली. निवडणुकीत शाळेतील विविध पदांसाठी विद्यार्थ्यांनी उमेदवारी अर्ज भरले होते. प्रचारानंतर मतदान प्रक्रिया शांततेत आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडली.

विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे मतदान करून लोकशाही मूल्यांचा अनुभव घेतला. मतदानासाठी मोबाईलवर EVM मशीन प्रणालीचा वापर केले गेला. विद्यार्थ्यांसाठी हा एक वेगळा अनुभव होता. मतदानानंतर मतमोजणी करण्यात आली आणि विजयी उमेदवारांची घोषणा करण्यात आली. विजयी उमेदवारांचे शाळेचे चेअरमन डॉ. शेखर जैन, मुख्याध्यापिका सौ. प्रणाली रेडकर, समन्वयक अजय बांदेकर, सर्व शिक्षक, पालक वर्ग यांनी अभिनंदन केले.

या निवडणुकीमुळे विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण, जबाबदारीची जाणीव, सहकार्याची भावना आणि लोकशाही प्रक्रियेविषयी आदर निर्माण झाला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शिक्षक व विद्यार्थी स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles