सावंतवाडी : सावंतवाडी मतदारसंघाच आमदार दीपक केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी जपत नगरपालिका सफाई कर्मचाऱ्यांना धान्याचे वाटप करण्यात आले. समाजाच्या आरोग्याची जबाबदारी खांद्यावर घेणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या प्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या प्रमुख उपस्थितीत धान्याचे वितरण करण्यात आले. यावेळी महिला जिल्हाप्रमुख तथा नगरसेविका ॲड. नीता सावंत-कविटकर, माजी जिल्हाप्रमुख अशोक दळवी, तालुकाप्रमुख दिनेश गावडे, नगरसेविका शर्वरी धारगळकर, ॲड. सायली दुभाषी, स्नेहा नाईक, पंचायत समिती सदस्या प्रणाली टिळवे, अजय गोंदावळे, जिल्हा सचिव परीक्षित मांजरेकर, अर्चित पोकळे, शैलेश मेस्त्री, सुनील नाईक, हर्षा जाधव, सुप्रिता धारणकर, पूजा नाईक, भारती परब, राजश्री निर्गुण, निलम कुमठेकर यांच्यासह शिवसेना पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने नगरपालिका सफाई कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी सफाई कर्मचाऱ्यांच्या निःस्वार्थ सेवेला सलाम करत त्यांच्या कार्याचे कौतुक केले. वाढदिवस हा केवळ शुभेच्छांचा सोहळा न राहता समाजोपयोगी उपक्रमातून साजरा व्हावा, या उद्देशाने आमदार दीपक केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, त्याचाच एक भाग म्हणून हा धान्य वाटपाचा उपक्रम राबविण्यात आला.
सफाई कर्मचाऱ्यांनीही या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त करत आयोजकांचे आभार मानले. सामाजिक जाणीव आणि सेवाभाव जपत राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे आमदार दीपक केसरकर यांच्या वाढदिवसाला समाजहिताचा अर्थपूर्ण आयाम लाभल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.



