सावंतवाडी : तालुक्यातील बांदा येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी एका युवकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अबुसाद इब्राहिम शहा (वय ३०) असे त्याचे नाव आहे. आमिषे दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा नातेवाईकांचा आरोप आहे.
दरम्यान सदर युवकाला जिल्हा न्यायालय हजर करण्यात आले असता चार दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली. संबंधित मुलगी ही अल्पवयीन असून ती सीमा भागात असलेल्या शाळेत शिकते आपल्या ओळखीचा गैरफायदा घेऊन संशयिताने त्या मुलीला आपल्या घरी बोलवून तिच्यावर वारंवार अत्याचार केला. आरोपी हा परिसरात मोलमजूरी करणार आहे. अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली.



