वेंगुर्ला : तुळस येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात मासिक जनआरोग्य समितीची बैठक सर्व सदस्य, अधिकारी आणि विविध विभागांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत उत्साहात पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी जनआरोग्य समितीच्या अध्यक्षा सौ. सुजाता पडवळ या होत्या.
बैठकीत प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत परिसरातील नागरिकांना दर्जेदार, सक्षम व वेळेवर आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे, आरोग्य सुविधांची गुणवत्ता अधिक उंचावणे तसेच शासनाच्या विविध आरोग्यविषयक योजनांची तळागाळापर्यंत प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. आरोग्य सेवेतील विविध अडचणी, उपाययोजना आणि विभागांमधील समन्वय वाढविण्यावरही सकारात्मक विचारमंथन झाले.
यावेळी उभादांडा मतदारसंघाचे जिल्हा परिषद सदस्य संजय दत्ताराम गावडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. रविंद्र लहानू लिलके, आरोग्य सहाय्यक तथा रुग्ण कल्याण समिती सदस्य दयानंद सोमा गवस, प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ. मिलिंद श्रीधर मोळके, आयुष वैद्यकीय अधिकारी डॉ. सानिया हारून खान, वरिष्ठ स्टाफ नर्स शिल्पा विजय आंबेरकर, ग्रामपंचायत आरोग्य उपसमितीचे सभापती सचिन सुरेश नाईक, महिला व बालविकास विभागाच्या क्षेत्र पर्यवेक्षिका शर्मिष्ठा पांडुरंग सामंत तसेच पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या प्रतिनिधी द्रौपदी अर्जुन नाईक उपस्थित होत्या.
याशिवाय तालुकास्तरीय शिक्षण विभागाचे अधिकारी संतोष दत्ताराम गोसावी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी प्रितम कैवल्य पवार, तुळस ग्रामपंचायतीच्या सरपंच रश्मी रामचंद्र परब, रोटरी क्लबचे सदस्य स्वप्निल वासुदेव झांटये, नोंदणीकृत स्वयंसेवी संस्थेचे आरोग्य प्रतिनिधी सचिन वासुदेव परुळकर तसेच आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बैठकीच्या शेवटी प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सुविधा अधिक सक्षम व प्रभावी करण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी परस्पर समन्वयाने कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला. नागरिकांना अधिक दर्जेदार आणि सुलभ आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी संयुक्त प्रयत्न करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.



