‘RPD’च्या सुवर्ण महोत्सवी गौरवशाली प्रवासाला गुरुवंदनेची जोड! ; उद्या गुरुपौर्णिमेनिमित्त निवृत्त प्राध्यापकांचा होणार सन्मान!

सावंतवाडी : राणी पार्वती देवी हायस्कूल व ज्युनियर कॉलेज, सावंतवाडीच्या उच्च माध्यमिक सांस्कृतिक विभागातर्फे गुरुपौर्णिमेनिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यंदा ज्युनियर कॉलेजच्या स्थापनेला ५० वर्षे पूर्ण होत असल्याने सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त उच्च माध्यमिक विभागातील निवृत्त प्राध्यापकांचा जाहीर सत्कार करण्यात येणार आहे.

हा कार्यक्रम बुधवार, २९ जुलै २०२६ रोजी सकाळी ९.१५ वाजता राणी पार्वती देवी हायस्कूल व ज्युनियर कॉलेजच्या सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. या विशेष प्रसंगी संस्थेच्या उच्च माध्यमिक विभागात कार्यरत राहून विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत मोलाचे योगदान देणाऱ्या निवृत्त शिक्षकांना सन्मानित करून त्यांच्या कार्याला कृतज्ञतेची मानवंदना दिली जाणार आहे.

सुवर्णमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधत आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात विद्यार्थी, शिक्षक, माजी विद्यार्थी तसेच पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. निवृत्त शिक्षकांचा सहवास विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल, असा विश्वासही संस्थेने व्यक्त केला आहे.

“गुरुपौर्णिमेच्या पावन पर्वावर गुरुजनांप्रती कृतज्ञता व्यक्त करताना शिक्षण परंपरेचा गौरव वाढविणारा हा सोहळा संस्मरणीय ठरणार!” असे मत संस्थेचे अध्यक्ष तथा भाजपा युवा नेते, जिल्हा परिषद सदस्य विक्रांत सावंत यांनी व्यक्त केले आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles