भोसले इंटरनॅशनल स्कूलची शुभ्रा देसाई ठरली गोल्डन गर्ल! ; जिल्हास्तरीय ज्युदो स्पर्धेत सुवर्णपदक मिळवत विभागीय स्पर्धेसाठी निवड.

सावंतवाडी: येथील यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलमधील इयत्ता सातवीची विद्यार्थिनी शुभ्रा संजीव देसाई हिने ओरोस येथील जिल्हा क्रीडा संकुलात आयोजित १४ वर्षांखालील जिल्हास्तरीय ज्युदो अजिंक्यपद स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले.

या स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवून शुभ्राने विभागीय स्तरावरील ज्युदो अजिंक्यपद स्पर्धेसाठी आपले स्थान निश्चित केले. तिच्या या यशामुळे यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

शुभ्राच्या या यशाबद्दल संस्थेचे कार्याध्यक्ष अच्युत सावंतभोसले, अध्यक्षा ऍड. अस्मिता सावंतभोसले, सचिव संजीव देसाई, शाळेच्या मुख्याध्यापिका प्रियंका देसाई यांनी तिचे अभिनंदन केले व विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles