– संदीप चव्हाण.
म्हापण : सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी यांच्या वाढदिवसा निमित्त रविवार, दि. २ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९.०० वाजता म्हापण बाजारपेठ येथील आनंद गावडे बिल्डिंग येथे विविध मोफत आरोग्य सेवा शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.
या सामाजिक उपक्रमांतर्गत नागरिकांसाठी मोफत रक्तदान शिबिर, नेत्र तपासणी शिबिर, मोफत चष्मा वाटप तसेच दंतचिकित्सा तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले असून परिसरातील नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
मनिष दळवी यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी सामाजिक बांधिलकी जपत विविध लोकहिताचे उपक्रम राबविले जातात. यंदाही आरोग्य सेवेला प्राधान्य देत सर्वसामान्य नागरिकांना मोफत वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याचा हा स्तुत्य उपक्रम असून, मोठ्या संख्येने उपस्थित राहून शिबिरांचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.



