सिंधुदुर्ग : सामाजिक कार्याची तळमळ, संघटन कौशल्य, निष्ठा आणि समाजसेवेप्रती असलेले समर्पण या गुणांची दखल घेत शिवशंभू प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्यच्या सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी जय भोसले यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सत्यवान जाधव यांनी दिनांक २५ जुलै २०२६ रोजी नियुक्तीपत्राद्वारे ही घोषणा केली. जय भोसले यांचा जिल्हाध्यक्ष म्हणून दोन वर्षांचा कार्यकाळ राहणार आहे.
या कालावधीत संस्थेची ध्येय-धोरणे व कार्यपद्धती यांचे पालन करत सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रतिष्ठानचा विस्तार करणे, नवीन सदस्यांची नोंदणी वाढविणे, विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करणे तसेच संस्थेची सामाजिक प्रतिष्ठा अधिक वृद्धिंगत करण्याची जबाबदारी जय भोसले यांच्यावर सोपविण्यात आली आहे.
शिवशंभू प्रतिष्ठानच्या माध्यमातून समाजहिताचे विविध उपक्रम अधिक व्यापकपणे राबविण्यासाठी जय भोसले यांच्या अनुभवाचा व संघटन कौशल्याचा निश्चितच उपयोग होईल, असा विश्वास संस्थेने व्यक्त केला आहे.
नियुक्तीबद्दल जय भोसले यांचे विविध स्तरातून अभिनंदन होत असून, त्यांच्या पुढील सामाजिक कार्यासाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.



