बांदा : निर्भीड पत्रकार पुरस्काराने सन्मानित झालेले ‘सकाळ’चे बांदा येथील प्रतिनिधी तथा बांदा मराठा समाजाचे संस्थापक अध्यक्ष निलेश मोरजकर यांचा बांदा महिला मराठा समाजाच्या वतीने शाल, श्रीफळ व रोप देऊन सत्कार करण्यात आला.
बांदा ग्रामपंचायत सभागृहात आयोजित या सत्कार समारंभाला बांदा महिला मराठा समाजाच्या अध्यक्षा स्वाती सावंत, उपाध्यक्षा ममता सावंत, सचिव माधवी गाड, तसेच अर्चना सावंत, रिना मोरजकर, लक्ष्मी सावंत, ग्रामपंचायत सदस्या रेश्मा सावंत, बांदा मराठा समाजाचे माजी खजिनदार राकेश परब आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी निलेश मोरजकर यांच्या निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारितेचे कौतुक केले. समाजहिताच्या विविध प्रश्नांना सातत्याने वाचा फोडत धाडसीपणे पत्रकारिता केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
या कार्यक्रमाला महिला मराठा समाजाच्या पदाधिकारी व सदस्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. यामध्ये वर्षा आगलावे, सोनल धूरी, मनाली नाईक, सिद्धी माजगावकर, सुशांती सावंत, प्रियांका सावंत, रितिका माजगावकर, सुचिता धूरी, दर्शना कावले, दिव्या नाईक, कोमल नाईक, कोमल चौगुले, अस्मिता माजगावकर, शुभांगी माजगावकर, सुचिता मुळीक, स्वाती सावंत, मयुरी नाईक, पूजा भाईप, रत्नप्रभा गवस, निशिगंधा सावंत, आशा सावंत आदींचा समावेश होता.

बांदा येथे निर्भीड पत्रकार पुरस्काराने सन्मानित निलेश मोरजकर यांचा सत्कार करताना बांदा महिला मराठा समाजाच्या पदाधिकारी व भगिनी.



