हुमरमळा येथील शालेय विद्यार्थिनीची गळफास घेत आत्महत्या.

कुडाळ : तालुक्यातील हुमरमळा गाळवणीवाडी येथील रहिवासी व पाट हायस्कूल मध्ये नववी इयत्तेत शिकत असलेल्या कु. युगा उमेश कानडे (वय १५) या शालेय विद्यार्थिनींने आज रविवारी (९ ऑगस्ट) रोजी सकाळी सुमारे ११ च्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली. कु. युगा ही पाट हायस्कूलमध्ये नववीच्या वर्गात शिकत होती.

या आत्महत्येचे नेमक कारण समजू शकले नाही. या घटनेबाबत निवती पोलीस स्टेशनमध्ये हुमरमळा पोलीस पाटील सुबोध सावंत यांनी कळविले. त्यानंतर पंचनामा करून तिच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. रविवारी सायंकाळी तिच्यावर साश्रू नयनांनी अंतिम संस्कार करण्यात आले.

दरम्यान युगाच्या पालकांना व नातेवाईकांना या घटनेने चांगलाच धक्काच बसला आहे. येथील गवंडीकाम करणारे उमेश कानडे यांची ती एकुलती एक कन्या होती. गाळवणीवाडी येथील अंतिम संस्कारावेळी सर्वच स्तरातील लोक उपस्थित होते. हुमरमळा तिठा येथील दुकाने बंद ठेवून तिला श्रध्दांजली वाहण्यात आली. पुढील तपास निवती पोलिसांतर्फे करण्यात येत आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles