मुंबई : अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त म्हणून तुकाराम मुंढे यांनी सध्या कारवाईचा धडका लावला आहे. दररोज FDA कडून धाडसत्र सुरु आहे. त्यामुळे अनेक मोठमोठी हॉटेल्स, उपहारगृह आणि रेस्टॉरंट मालकांचे धाबे दणाणले आहे.
तुकाराम मुंढे यांच्या FDA ने आता डॉमिनोज पिझ्झावर धाड टाकली आहे. व्हेज-नॉन व्हेजसाठी एकच प्लॅटफॉर्म होता.मुंबईतील तीन आउटलेट्सचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत.



