ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेचे राज्य अधिवेशन वडगाव मावळ येथे उत्साहात संपन्न, अनेक मान्यवरांची उपस्थिती व मार्गदर्शन. ; कोकण विभागाचा उत्कृष्ट कार्यकर्ता पुरस्कार विष्णूप्रसाद दळवी यांना तर सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानला ग्राहक पंचप्राण पुरस्कार प्रदान!

वैभववाडी :  ग्राहक केंद्रबिंदू मानून कार्य करणाऱ्या ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेचे दोन दिवशीय वार्षिक राज्य अधिवेशन दि.८ व ९ ऑगस्ट रोजी शिवराज पॅलेस, वडगाव मावळ जिल्हा पुणे येथे संस्थेचे राज्य अध्यक्ष डॉ. विजय लाड यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात संपन्न झाले.


या दोन दिवसीय अधिवेशनाचे उद्घाटन राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे अध्यक्ष मा. न्यायमुर्ती श्री. सुरेंद्र तावडे यांच्या शुभहस्ते झाले. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून माजी अर्थमंत्री तथा आमदार श्री. सुधीरभाऊ मुनगुंटीवार,
आमदार श्री. सुभाषबापू देशमुख, आमदार श्री. सुनिल शेळके व माजी मंत्री श्री.संजय भेगडे, संस्थेचे संघटक श्री. सर्जेराव जाधव, सचिव श्री. अरूण वाघमारे, सहसचिव व सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रा. एस.एन. पाटील, सहसंघटिका मेधाताई कुलकर्णी, कोषाध्यक्ष सुनितारीजे घाटगे व सदस्य श्री. प्रमोद कुलकर्णी, श्री. हेमंत मराठे, श्री. शामकांत पात्रीकर व प्रा.चंद्रकांत डागा आदी मान्यवर उपस्थित होते.
संस्थेच्या राज्य अधिवेशनात राज्यातील ग्राहक हितार्थ व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्‍या मान्यवरांचा राज्यस्तरीय पुरस्कार देवून गौरव करण्यात आला.
यामध्ये श्री.रामराव जगदाळे यांना समाजभूषण पुरस्कार तसेच अर्थव्यवस्थेचे पंचप्राण पुरस्कार अंतर्गत श्रमिक क्षेत्रात श्री. विठोबा लच्छिराम ध्यानध्यान (नाशिक), व्यापारी श्रेत्रात श्रीमती सुविधी जयस्वाल (नागपूर), शेतकरी क्षेत्रात पांडुरंग बरळ (पुणे), उद्योजक क्षेत्रात रयत आरोग्य मंडळ(नांदेड), ग्राहक क्षेत्रात सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान (सिंधुदुर्ग-कोकण) यांना पुरस्कार देवून गौरविण्यात आले. संस्थेचे सचिव श्री.अरूण वाघमारे यांनी ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेच्या माध्यमातून ग्राहक हितार्थ केलेले कार्य व संस्थेच्या वाढीसाठी केलेल्या कार्याची दखल घेऊन राज्य कार्यकारिणीच्या वतीने मानपत्र व शाल श्रीफळ देऊन गौरविण्यात आले.
तसेच संस्थेच्यावतीने विभागनिहाय उत्कृष्ट कार्यकर्ता पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
कोकण विभागाचा उत्कृष्ठ कार्यकर्ता पुरस्कार सिंधुदुर्ग जिल्हा संघटक श्री. विष्णूप्रसाद विठ्ठल दळवी यांना मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला. या अधिवेशनात विविध विषयांवर तज्ञ मान्यवरांनी मार्गदर्शन केले. त्यामध्ये सहआयुक्त अन्न व औषध प्रशासन पुणे यांनी अन्न सुरक्षा,
सर्जेराव जाधव – शेतकरी ग्राहक, प्रा. एस.एन.पाटील- संस्थेची त्रिसूत्री व कार्यपद्धती, महेंद्र दिवाकर-वीज ग्राहक
गा-हाणे निवारण मंच, मेधाताई कुलकर्णी- सजग विद्यार्थी ग्राहक प्रबोधन अभियान, प्रा. चंद्रकांत डागा- कार्यकर्ता कसा असावा, योगेश ठाणगे- सायबर क्राईम, विजय जोशी- अमृतयोजना व ग्राहक चळवळ, शामकांत पात्रीकर –
ग्राहक संरक्षण परिषद आणि जिल्हा ग्राहक आयोग या विषयावर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिव अरूण वाघमारे तर आभार नितीन मिंडे यांनी मांडले.
संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन
वसुधा जहागीरदार व मिनाक्षी सोळुंके यांनी केले.
अधिवेशनाला राज्यातील ३० जिल्ह्यातील ५२० प्रतिनिधी उपस्थित होते.
अधिवेशनाच्या यशस्वीतेसाठी
राज्य अध्यक्ष डॉ.विजय लाड, सचिव श्री. अरुण वाघमारे, संघटक श्री. सर्जेराव जाधव व सर्व राज्य कार्यकारिणी तसेच
पुणे जिल्हा शाखा व पुणे महानगर कार्यकारिणी
यांनी विशेष प्रयत्न केले.
अधिवेशनचा समारोप अध्यक्ष डॉ.विजय लाड यांच्या प्रेरणादायी भाषणाने झाला.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles