नितीन गावडे
सावंतवाडी : मळगाव इंग्लिश स्कूलमधील संगीत कला विषयातील शिक्षक श्री. प्रकाश वासुदेव केसरकर यांना पुण्यातील ज्योतिष वास्तू विश्व संशोधन केंद्र यांच्याकडून वास्तू विषारद , वास्तूभूषण व इयर ऑफ दी अचिव्हमेंट पदवी देऊन गौरवण्यात आले.
ज्योतिष वास्तू विश्व संशोधन केंद्र, पुणे यांच्यावतीने २० ऑक्टोबर रोजी विणकर सभागृह येथे जोतिष वास्तू विश्व केंद्रातील विविध कोर्समध्ये उत्तीर्ण झालेल्या व्यक्तींना पदवी प्रदान करण्यात आली. वास्तू विशारद, वास्तू रत्न, वास्तू भूषण आणि लोलक विशारद, अंक विशारद यांसारख्या कोर्सेसमध्ये प्रवेश घेऊन यशस्वीरित्या आपले वर्ग पूर्ण करून घेतल्या गेलेल्या, परीक्षेमध्ये घवघवीत यश मिळविलेल्या सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व ट्रॉफी देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
श्री. केसरकर यांना ज्योतिष वास्तू शास्ञातील अथक मेहनतीचे योग्य फळ मिळाल्यानंतर त्यांचे सर्वञ कौतुक होत आहे.