पुणे : पुण्याच्या बारामतीत पती-पत्नीच्या नात्याला काळिमा फासमारी घटना घडली आहे. पुण्याच्या बारामतीत महिलेने तिच्या नवऱ्याला जमिनीत जिवंत गाडण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी पत्नीला अटक केली आहे. अटक केल्यानंतर पत्नीने पोलीस चौकशीत हादरणारा खुलासा केला आहे. पती रोज मारहाण करायचा. मला नोकरी करू द्यायचा नाही, असा आरोप पत्नीने केलाय. पत्नीने पोलीस चौकशीत आणखी काही हादरवणारे खुलासे केले आहेत.
शर्मिला जगताप असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. तिने म्हटलं की, ‘नवऱ्याने माझी अवस्था एका मोलकरणीसारखी केली होती. बी फार्मसीचे शिक्षण घेऊनही नोकरी करायला बाहेर जाऊ देत नव्हता. कायम मारहाण करत राहायचा. पतीच्या वागण्याने नैराश्यात गेले होते. मुलांनाही सारखी मारहाण करायचा. घरात मोलकरणीसारखं बनवून ठेवलं होतं, असा आरोप शर्मिलाने केला.
काय आहे नेमकं प्रकरण?



