वाढदिवसाचा उत्सव संजू परबांचा अन् जागर कोकणच्या लोककलेचा! ; सह्याद्री फाउंडेशनतर्फे नाट्यरसिकांसाठी खास मेजवानी! ; गोविंद चित्रमंदिरात रंगणार दशावतारी नाट्यप्रयोग ‘कृष्ण-हनुमान युद्ध’.

सावंतवाडी : सह्याद्री फाउंडेशन, सावंतवाडीच्या वतीने फाउंडेशनचे माजी अध्यक्ष तथा शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या वाढदिवसानिमित्त नाट्यरसिकांसाठी अनोखी सांस्कृतिक मेजवानी आयोजित करण्यात आली आहे. सिद्धेश्वर दशावतार नाट्यमंडळ, दोडामार्ग यांचा बहारदार ‘कृष्ण-हनुमान युद्ध’ हा दशावतारी नाट्यप्रयोग रसिकांच्या भेटीला येणार आहे.

दि. १९ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७ वाजता सावंतवाडी येथील गोविंद चित्रमंदिर येथे हा नाट्यप्रयोग रंगणार असून, दशावतारी कलेच्या पारंपरिक रंगतदार सादरीकरणाचा आनंद नाट्यप्रेमींना घेता येणार आहे.

कोकणच्या मातीत रुजलेल्या दशावतारी कलेला रसिकांची मिळणारी दाद ही या लोककलेची खरी ताकद आहे. भक्ती, शौर्य, संघर्ष आणि मनोरंजनाची सांगड घालणाऱ्या ‘कृष्ण-हनुमान युद्ध’ या नाट्यप्रयोगातून गोविंद चित्रमंदिरात रंगमंचावर चैतन्याची लाट उसळणार आहे.

या नाट्यप्रयोगाचा अधिकाधिक नाट्यरसिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन सह्याद्री फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सुनील राऊळ आणि विद्यमान अध्यक्ष तथा जिल्हा बँक संचालक रवींद्र मडगावकर यांनी केले आहे.

संजू परब यांच्या वाढदिवसाचा उत्सव… आणि कोकणच्या लोककलेचा जागर! या दुहेरी पर्वामुळे उद्याची सांस्कृतिक संध्याकाळ नाट्यप्रेमींसाठी निश्चितच अविस्मरणीय ठरणार आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles